श्री. सो. स. क्षत्रिय समाज युवक संघटना मार्फत मोफत हृदय शस्त्रक्रिया
पुणे : श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज ट्रस्ट पुणे A१६ व श्री सद्गुरू शंकर महाराज अन्नछत्र समिती (मोफत रुग्ण सेवा अभियान) आरोग्य शिबिर यांच्या मार्फत श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन भगवान जयंती निमित्त स्वारगेट येथे डॉ. श्री दिनेश सुर्यकांतसा रंगरेज यांनी मोफत महाआरोग्य शिबीर व मोफत सर्व शस्त्रक्रिया शिबीर आयोजन करण्यात आले होते याच शिबिराच्या माध्यमातून आपल्या समाजातील श्री. राजेंद्र पवार यांची कन्या अनु, वय 31 वर्ष, तिच्या हृदयाचे ऑपरेशन (PDA Device Procedure ) हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अजित मेहता ह्यांनी हे अवघड ऑपरेशन यशस्वीपणे पूर्ण केले.
विशेष म्हणजे ऑपरेशनच्या आधी अनुला खूपच त्रास होता, CAHD, Large PDA, Severe PH असे तिचे निदान होते, मोठे छिद्र, तिला खूप धाप लागणे, घाम येणे, सारखी सर्दी व खोकला थोडक्यात न्यूमोनियाची लक्षणे त्यामुळे हे ऑपरेशन लवकर करणे खूप गरजेचे होते. ऑपरेशनचा एकंदरीत हा खर्च खूप असल्याने आता पर्यंत करता आले नाही, स्वतः अनु शिलाई काम करत होती ह्या ऑपरेशन साठी ते काहीच खर्च करू शकत नव्हते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, श्री सहस्त्रार्जुन महाराजांच्या कृपेने, आमच्या सोशल सर्विस टीम ने अनु राजेंद्रसा पवार यांच्या ऑपरेशन साठी सर्व निधी गोळा केले व तीचे ऑपरेशन पुर्णपणे मोफत झाले. आम्ही विविध संस्था, मुकुल माधव फौंडेशन, VIP डोनर्स ह्यांनी आम्हाला या ऑपरेशन साठी आर्थिक मदत केली. हे ऑपरेशन डॉ अजित मेहता आणि त्याच्या टीमने हे यशस्वी करून दाखविले.
यासाठी आम्हाला विशेष सहकार्य श्री.डॉक्टर दिनेश सुर्यकांतसा रंगरेज, शिवसेना पुणे शहर समन्वयक श्री राजाभाऊ भिलारे, श्री सद्गुरू शंकर महाराज अन्नछञ समिती (ट्रस्ट)अध्यक्ष श्री.राजाभाऊ रेवडे, तसेच विविध संस्था ज्यांनी या रुग्णास मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात यांचे सर्वांचे विशेष सहकार्य लाभले. अनु राजेंद्र पवार कुटुंबाने डॉ.दिनेश रंगरेज, जहांगीर हॉस्पिटल, डॉ अशोक घोणे, डॉ अजित मेहता श्री. सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज ट्रस्ट पुणे A१६, अध्यक्ष श्री मनोज आरसिद्ध व कार्यकारणी तसेच युवक संघटना पुणे या सर्वांचे खूप आभार मानले.
तसेच आम्ही आपण सर्वांना या माध्यमातून आवाहन करत आहोत की जर आपल्या भागातील असेच कोणी गरजू लहान मुलं असतील त्यांना आपण कधीही आमच्याकडे आमच्या रुग्णालयात पाठवू शकता, त्या बालकांचे ऑपरेशन्स मोफत यशस्वीपणे होईल याची आम्ही आपणास पूर्ण ग्वाही देतो.
