Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

कर्तव्य गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

पुणे: कर्तव्य फाउंडेशन आयोजित कर्तव्य गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला, यावेळेस प्रमुख अतिथी जेष्ठ समाजसेवक भिमराव पाटोळे, राम बांगड, प्रा.डाॅ. विलास आढाव, दिलीप गिरमकर, मोहन दुधाणे, संदीप भोसले, मन्सूर शेख, आयोजक विकास भांबुरे, अशोक देशमुख, सचिन कांबळे, रवी पवार आदी उपस्थित होते.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात मुक्त पत्रकार धोंडप्पा नंदे (स्व.पत्रकार महेश जांभूळकर आदर्श पत्रकार पुरस्कार), गिर्यारोहक सुनील पिसाळ (एव्हरेस्टवीर स्व. स्वप्नील गरड साहसी गिर्यारोहक पुरस्कार), समाजसेवक कुमार शिंदे (स्व.रणजित परदेशी स्मृती आदर्श कार्यकर्ता पुरस्कार), कर्नल सुरेश पाटील (पाणी मित्र पुरस्कार), शिरीष केदारी (स्व.अरविंद जाधव स्मृती आदर्श जेष्ठ नागरिक पुरस्कार), कवी नरेश चव्हाण (लेखक स्व.धर्मपाल कांबळे स्मृती आदर्श साहित्यिक पुरस्कार), डाॅ.बंटी धर्मा (आदर्श डाॅक्टर पुरस्कार), पोलीस हवालदार रहीशा शेख (आदर्श पोलीस पुरस्कार), अल-खैर वेलफेअर फाउंडेशन (आदर्श सामाजिक संस्था) व सहा.कार्य.अभियंता विजय चव्हाण (आदर्श कॅन्टोन्मेंट अधिकारी पुरस्कार) आदींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच सी.ए.अरविंद खंडेलवाल,  माधुरी गिरमकर, पाॅवरलिफ्टर शाम साहनी,  आरती हिरवे व महेंद्र भोज यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील बाथम, विजय भोसले, महेंद्र कांबळे, मोहीत शहा, समीर सय्यद आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास भांबुरे यांनी केले तर दिलीप भिकुले यांनी सूत्रसंचालन पार पाडले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading