Wednesday, November 11, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अध्यक्षांसमोर जी सुनावणी झाली त्याचं रेकॉर्ड १ एप्रिलपर्यंत सुप्रीम कोर्टात सादर करा

नवी दिल्ली : शिवेसना आमदार अपात्रतेप्रकरणी (ShivSena MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. आज या प्रकरणी कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली. आज झालेल्या सुनावणीदरम्यान, कोर्टाचा शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे.

राहुल नार्वेकर यांना कोर्टानं १ एप्रिलपर्यंत यासंबंधीची कागदपत्रे सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सादर करण्याचा आदेश दिले आहेत. जरी निवडणूक आयोगानं (Election Commission) पक्षाबाबत काहीही निकाल दिलेला असला तरी तुम्ही अगदीच तसाच निकाल दिला पाहिजे असं काही नाही. तुम्ही आवश्यक ती कागदपत्रे तपासून तुमच्या सद्सदविवेकबुद्धीनं निकाल द्यावा, असे कोर्टाने राहुल नार्वेकर यांना सुचवलं होत.

गोगावलेंमार्फत आधीच हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केली. त्यावर अध्यक्षांना पक्षकार बनवले होते. पण आता इथे अध्यक्षांना पक्षकार बनवता येत नाही. सुप्रीम कोर्टानं आजच्या सुनावणीत असं म्हटलं की, अध्यक्षांसमोर जी सुनावणी झाली त्याचं रेकॉर्ड १ एप्रिलपर्यंत सुप्रीम कोर्टात सादर करा. या प्रकरणी पुढील सुनावणी ८ एप्रिलला सुप्रीम कोर्टातच होणार आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना काहीसा दिलासा मिळाला आहे.

 

Leave a Reply