Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

इजिप्तमधील जागतिक परिषदेसाठी पुण्याचे डॉ. कुणाल कामठे निमंत्रित

पुणे : पुण्यातील मुळव्याध तज्ञ डॉ. कुणाल कामठे यांना इजिप्तमधील होणाऱ्या ‘पेल्विक फोर डिसीजेस’ या विषयावरील जागतिक परिषदेत बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. दिनांक ७ ते ९ मार्च दरम्यान ही आंतरराष्ट्रीय परिषद कैरो येथे होणार आहे. लोकल भूल देऊन मूळव्याध आणि गुदगत भागातील ऑपरेशन करण्याचा शोधनिबंध ते यावेळी मांडणार आहे.

मेडिटरीनियन सोसायटी ऑफ पेल्विक फ्लोर डिसऑर्डर्स आणि इजिप्शियन सोसायटी ऑफ कोलन अँड रेक्टम यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. जगभरातून २२ देशांचे प्रतिनिधी या परिषदेसाठी येणार आहेत. भारतातून चार डॉक्टरांना या परिषदेसाठी निमंत्रण मिळाले आहे त्यापैकी डॉ. कुणाल कामठे हे एक आहेत.

लोकल भूल देऊन मूळव्याध आणि गुदगत भागातील ऑपरेशन करण्याचा शोधनिबंध ते यावेळी मांडणार आहे. यापूर्वी नेदरलँड येथे ‘क्षारकर्म मूळव्याधीसाठी विना ऑपरेशन एक आयुर्वेदिक विचार’ या विषयावर त्यांनी आपला शोध निबंध सादर केला होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading