Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

बिबट्याला जेरबंद करण्यात प्रशासनाला यश

पुणे : अखेर 48 तासानंतर कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील बिबट्याला जेरबंद करण्यात प्रशासनाला यश आले आहे. बिबट्या सापडल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे. अखेर रात्री सव्वा नऊच्या दरम्यान बिबट्या एका पिंजऱ्यात अडकला. 

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्याच्या हालचाली टिपणाऱ्या वेगवेगळ्या कॅमेऱ्यासह खाद्य टाकून 9 पिंजरे लावण्यात आले होते. अखेर तो एका पिंजऱ्यात अडकला.

सविस्तर माहिती अशी, की कात्रज येथील   राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून नर जातीचा  बिबट्या काल (दि. 04)  पसार झाला होता. एक दिवस उलटूनही त्याचा शोध लागत नव्हता. त्यामुळे संग्रालय कालपासून पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. तो संग्रहालयाच्या विविध कॅमेरातून दिसत होता. त्यामुळे तो उद्यानाबाहेर गेला नाही हे मात्र ठाम होते.

बिबट्याला शोधण्यासाठी अग्निशमन दलासह विविध पथके तैनात करण्यात आले होते. या सर्वांच्या शोधमोहिमेला यश आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading