Monday, June 15, 2026
Latest NewsSports

पुण्यात होणाऱ्या ऑक्सफर्ड प्रीमियर लीगच्या खेळाडूंचा उत्साह शिगेला

 

पुणे  : येत्या एप्रिल मध्ये पुण्यात होणाऱ्या अतिशय नावाजलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रिमीअर लीगच्या खेळाडूंचा उत्साह अतिशय शिगेला पोहचला आहे .नुकताच पुण्यात देशभरातील खेळाडूंचा सामनापूर्व स्नेहमिलन समारंभ अतिशय दिमाखदार व उत्साहात ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट येथे पार पडला .या समारंभात खेळाडूंनी सहभागी होऊन सर्व संघातील खेळाडूंचा परिचय करुन गोल्फ लीग अतिशय रंगतदार होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला .त्यामुळे यावर्षीच्या ओपीएल मध्ये पुणेकराना अतिशय चुरशीचे गोल्फ सामने बघायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे .
या दिमाखदार समारंभाचे उद्घाटन गोल्फ इंडस्ट्री आसोसिएशन चे अध्यक्ष व ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्टचे संचालक अनिल सेवलेकर यांनी केले तसेच त्यांच्या हस्ते प्रतेक संघाच्या प्रायोजकांचे व खेळाडूंचे विशेष स्वागत करण्यात आले .यावेळी फिक्की च्या माजी अध्यक्षा नीलम सेवलेकर ,एस.गोल्फिंग चे आदित्य मालपणी यासह खेळाडू आणि संघ प्रायोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या लीगमधील बिनधास्त बॉईज ,ब्लिस्ट्रिंग बर्डीज,दुबई फाल्कन्स,ईगल फोर्सेस , झिंगर्स, ग्रीन गॅडीटर्स, लेगन्सी क्लब , पुना लायन्स, रोरिगंस टायगर्स नागपूर , शुबाण सनरायजर्स ,सॉफ्टसेल स्विंगर्स ,सुलतान ऑफ स्विंग ,झिंगर्स
या सर्व संघातील खेळाडू आजच्या समारंभास उपस्थित होते .सर्वच संघातील खेळाडूंनी यावर्षीचा विजयी चषक जिंकण्याचा संकल्पव केल्यामुळे यावर्षीची ऑक्सफ़र्ड प्रीमिअर लीग अतिशय रंगतदार होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading