Sunday, June 7, 2026
BusinessLatest News

पुण्यातील लघु आणि मध्यम उद्योगांसाठी फोनपेतर्फे पिजी कनेक्ट लॉन्च

पुणे  : भारतातील फिनटेक क्षेत्रातील आघाडीच्या फोनपे तर्फे पुण्यातील लघु आणि मध्यम उद्योगांसाठी पिजी कनेक्ट लॉन्च करण्यात आले आहे. लघु आणि मध्यम उद्योगांनी (SME) त्यांच्या ऑनलाइन व्यवसायाची निर्मिती व विस्तार करण्यासाठी टेक स्टॅकची पूर्ण क्षमता समजून घेऊन जागरूकता वाढवणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

कनेक्ट सत्रे ही फोनपे च्या अनेक शहरांमधील उपक्रमाचा एक भाग असून, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (SME) ती जयपूर, कोलकाता यासारख्या उदयोन्मुख शहरांमध्ये प्लॅन करण्यात आली आहेत. संपूर्ण एसएमई मधील वरिष्ठ आणि निर्णयक्षण प्रमुख नेतृत्व यांना स्वतःची ऑनलाइन उपस्थितीचा शोध अनुकूल करणे आणि आपला व्यवसाय वाढवण्यासाठी तंत्रज्ञानातील नावीन्यततेचा फायदा घेणे यासाठी त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे.

या उपक्रमाबद्दल बोलताना, फोनपे पेमेंट गेटवे आणि ऑनलाइन मर्चंटचे, प्रमुख श्री.अंकित गौर, म्हणाले, “एक मजबूत तंत्रज्ञान स्टॅक हा ऑनलाइन व्यवसायाच्या यशाचा कणा आहे, जो अत्याधुनिक पेमेंट पद्धतींना चालना देतो. समविचारी उद्योजकांच्या समुदायाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अर्थपूर्ण ज्ञानाची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी फोनपे पिजी कनेक्ट इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योग जगताबद्दल अधिक माहिती देणे आणि सहकार्य वाढवून लघु आणि मध्यम उद्योगांच्या (SMEs) वाढीसाठी पाठिंबा देणे हे आमचे ध्येय आहे. पुण्याच्या गतिशील व्यवसाय उद्यो
गांमध्ये, धोरणात्मक वाढीसाठी, ग्राहकांच्या समाधानासाठी आणि एकूणच उत्तम व विश्वासू व्यवहारासाठी योग्य पेमेंट भागीदार निवडणे महत्त्वाचे आहे.”

पुण्यात झालेल्या या भेटीगाठीमध्ये एक मास्टरक्लास घेण्यात आला. जिथे नवोदित स्टार्टअप संस्थापक आणि विविध उद्योगांमधील उत्साही उद्योजक त्यांच्याकडील माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी, व्यवसायातील आव्हानांवर चर्चा करण्यासाठी आणि पुढे कसे जायचे हे एकमेकांकडून शिकण्यासाठी एकत्र आले होते. सत्रातील उपस्थितांनी योग्य पेमेंट गेटवे निवडणे, उद्योगातील सर्वोत्तम पद्धती समजून घेणे आणि व्यवसाय स्केलेबिलिटीसाठी साधने वापरणे यावर सखोल माहिती मिळवली. पुणे येथे स्थित, एफआयटीटीआर चे सह-संस्थापक, श्री.रोहित चट्टोपाध्याय यांनी सर्वात मोठ्या ऑनलाइन फिटनेस समुदायांपैकी एक असलेला एफआयटीटीआर समुदाय कसा तयार केला याबद्दल काही नोंदी सांगून अधिक माहितीची देवाण-घेवाण केली.

भविष्यातील फोनपे पिजी कनेक्ट इव्हेंटचा एक भाग म्हणून, फोनपे पेमेंट गेटवे लघु आणि मध्यम उद्योगांना (SME) दीर्घकालीन यशासाठी योग्य मार्गदर्शन करत राहील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading