फडणवीसांचा ‘गृह खात्यात जीव’ की ‘अजितदादांवर अविश्वास’ ..? काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे : प्रलंबित व प्रचलित ‘शासकीय सेवक भरतीच्या’ श्रेयजीवी नमो रोजगार मेळाव्यात, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी ‘भाजपने निष्कलंक ठरवलेल्या’ मा अजित पवारांना गृहखाते मात्र न देण्याचे जाहीर विधान केले.
वास्तविक पाहता, अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद शेअर करून, शिंदेसेनेचा आक्षेप झुगारून अर्थखाते ही दीले. असे असतांना मा अजित पवारांच्या विश्वसनीयतेवर, कार्यक्षमतेवर वा हेतुवर आक्षेप उपस्थित करण्यामागचे गौडबंगाल काय(?) हे देखील भाजप’ने जाहीर करावे, या आशयाची पोस्ट काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी “फेसबुक, एक्स व ईन्स्टाग्राम या सोशल मिडीया” माध्यमातुन केली आहे..! राज्यातील “भाजप पुरस्कृत” त्रिकुट सरकारने प्रलंबित व प्रचलित शासकीय भरतीच्या कार्यक्रमात’ देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना ऊद्देशून वरील विधान केले. एकीकडे राजकीय घरफोडीने शिंदेसेने सोबत सत्ता व संख्याबळ असुनही, सत्ता चालवता येत नसल्याने (जनतेने भाजप विरोधी कौल दिलेल्या) राष्ट्रवादीचे नेते श्री अजितदादा पवार यांना रेड कार्पेट टाकून उपमख्यमंत्री पद दिले. वास्तविक दस्तूर खुद् पंतप्रधानांनी मा अजितदादा पवारांवर सिंचन धोटाळ्याचे जाहीर आरोप ही केले होते. मात्र भाजप’ला अखेर पंतप्रधानांचे आरोप हे सारासार खोटे व निराधार असल्याचे जाणवले व अजितदादांची कर्तबगारी, कार्यक्षमतां लक्षांत येताच् ८ दिवसांत अजितदादा व सहकाऱ्यांना (पार्टी विथ डिफरन्सचा दावा करणाऱ्या) चारित्र्य संपन्न ‘भारतीय जनता पक्षाने’ मंत्रीपदे देऊन, सत्तेत वाटा देखील दिला.
मात्र त्यांना गृह-खाते न देण्यामागे काय गौडबंगाल आहे(?) असा उपहासात्मक सवाल ही काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.
राज्याची शैक्षणिक व सांस्कृतीक राजधानी असलेल्या पुणे शहरात पकडण्यात आलेले कोट्यावधींचे ड्रग पुन्हा विकले जात असल्याचे व त्याचे पैसे हवाला मार्फत दिल्ली येथे जात असल्याचेही ऊघडकीस आले आहे..!
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शब्बीर सैय्यद यांनी दिलेल्या माहीती मुळे पुणे पोलीस अघिकाऱ्यांवर ‘संविधानीक कर्तव्यपुर्तीचे संस्कार असल्याची बाब समोर येणे ही देखील समाधानाची बाब असल्याचे काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी म्हंटले आहे.
