मुलांमध्ये वाचनाची सवय वाढवण्यासाठी UBS चे मॅरेथॉनला सहकार्य
मॅरेथॉनचे आयोजन रनऑन आणि सिक्युअर गिव्हिंग यांच्या भागीदारीने करण्यात आले
UBS ही एक अग्रगण्य जागतिक वित्तीय सेवा फर्म आहे. कंपनीने पुण्यात रविवारी 25 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या मॅरेथॉनला सहकार्य केलेच शिवाय यामध्ये ६०० कर्मचारीही धावले. RunOn आणि Secure Giving च्या सहकार्याने ही मॅरेथॉन कार्यक्रम निधी उभारण्यासाठी तसेच मुलांमध्ये शिक्षण आणि वाचनाच्या सवयी वाढवण्यासाठी जागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती.
UBS कर्मचाऱ्यांसाठी मॅरेथॉनमध्ये – २१ किमी अर्ध मॅरेथॉन, १० किमी धावणे आणि ५ किमी धावणे या सर्व स्र्पर्धा खुल्या होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन UBS पुनीत व्यास (स्ट्रीम टेक्निकल लीड, सीडीआयओ आयबी ऑपरेशन्स आणि सीडीआयओ आयबी रिजनल लीड, इंडिया), अनुभव अग्रवाल (इंडिया सर्व्हिस कंपनीचे मुख्य प्रशासकीय अधिकारी), जीवन दळवी (डब्ल्यूएमपीसी टेक इंडिया इंजिनिअरिंग सेंटरचे प्रमुख) आणि शर्मीन कुटकी (भारतीय सामाजिक प्रभाव आणि परोपकारासाठी समुदाय प्रभाव लीड) यांच्या हस्ते करण्यात आले. भाषणादरम्यान UBS ने सामाजिक जबाबदारी उपक्रम, प्रामुख्याने शिक्षण आणि मुलांमधील साक्षरता याविषयीचे आपले निरंतर समर्पण अधोरेखित केले.
या मॅरेथॉनच्या माध्यमातून जमा केलेले योगदान युनायटेड वे मुंबईच्या लेट्स रीड कॅम्पेनच्या माध्यमातून वापरले जाईल. हा उपक्रम वंचित मुलांना वाचन साहित्य उपलब्ध करून देऊन वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी होता. जमा झालेल्या निधीमुळे महाराष्ट्रातील 1,000 मुलांना चार पुस्तके, एक जर्नल, एक पेन आणि एक बॅग असलेले वाचन किट उपलब्ध करून दिले जाईल..
UBS चे कर्मचारी या कारणासाठी एकत्र आले तेव्हा त्यांना मोठी प्रेरणा मिळाला.
शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे आणि त्यातून समाजात सकारात्मक परिणाम घडवून आणणे हे UBS चे मिशन आहे. मॅरेथॉन हा त्याचाच भाग आहे.
