श्रीराम प्रमाणे जर सर्वांनी आपापल्या मर्यादित राहिले तरच पुन्हा रामराज्य येईलः- जया किशोरी
पुणे : भगवान विष्णूंचे दोन अवतार आहेत, त्यातील एक अवतार मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आणि श्याम म्हणजेच श्रीकृष्ण. भगवान श्रीरामांनी मर्यादेत कसे राहायचे हे शिकवले. तर श्रीकृष्णाने मयदित कसे ठेवायचे, हे शिकवले. सध्याच्या काळात श्रीराम प्रमाणे जर सर्वांनी आपापल्या मर्यादित राहिले तरच पुन्हा रामराज्य येईल, असे मत आध्यात्मिक प्रवक्त्या जया किशोरी यांनी व्यक्त केले.
जगदीश मुळीक फाउंडेशनतर्फे संगमवाडी येथे श्रीराम कथा सत्संग आयोजित केला होता. त्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी गायिका अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी आमदार माधुरी मिसाळ, फाउंडेशनचे जगदीश मुळीक, योगेश मुळीक,रविंद्र वंजारवाडकर,आमदार माधुरीताई मिसाळ, शहराध्यक्ष भाजपा पुणे शहर धीरज घाटे,आमदार सुनील कांबळे, दादा वेदक, मनोज पोचट,बापूसाहेब पाठारे, योगेश टिळेकर, शीतल महाजन, तृप्ती देसाई, संदीप खर्डेकर, अर्चना पाटील अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जया किशोरी म्हणाल्या की, प्रभू श्रीरामांच्या वाट्याला आयुष्यभर कठीण प्रसंग, दुःख, वेदना आल्या. त्यांना राजगादी सोडावी लागली, वनवसाला जावे लागले, तरीही त्यांनी आपली मर्यादा सोडली नाही. प्रत्येक कठीण प्रसंगावर मात करणाऱ्या श्रीरामांचे जोवन चरित्र हेच आपल्याला सकारात्मक विचारांची शिकवण देते,” यावेळी कथा निरूपणामध्ये जया किशोरी यांनी रामायणातील सीता, लक्ष्मण, भरत, विभीषण, शबरी, हनुमान अशा विविध व्यक्तिरेखा उलगडल्या.
यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या, अयोध्येत श्रीरामलल्लाची प्रतिष्ठापना झाली. हा एक अद्वितीय क्षण होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे शक्य झाले. मला राजकीय बोलायचे नाही. पण, भगवान श्री रामांनी आपल्या वडिलांचे ऐकले. राज्यत्याग करून वनवासाला गेले. आता काही जण आपल्या वडिलाच्या विचार पुढे चालवत नाही. यावेळी जगदीश मुळीक म्हणाले की, पाचशे वर्षांची प्रतीक्षा संपली अयोध्यामध्ये राम मंदिर झाले. इंदौर शहर भारतातील सर्वात स्वच्छ शहर होऊ शकते. तर, पुणे शहर का नाही. पुणे शहराला जगातील स्वच्छ शहर करायचे. त्यासाठी प्रत्येक पुणेकरांनी स्वच्छ पुणे करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
