Monday, October 5, 2026
ENTERTAINMENTLatest News

कावेरी घेईल का नोकरी करायचा निर्णय?

कलर्स मराठीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत राज, कावेरी आणि रत्नमाला यांची नवी सुरुवात आपण पाहतो आहे. राजवर्धन मोहिते जो ‘माहेरचा चहा’ हा बिझनेस सांभाळायचा तो आता एका कंपनीत नोकरी करतोय. या कंपनीत त्याची टीम लीडर किमया ही त्याला खूप संभाळून घेते. राजने किमयाला कावेरी आणि रत्नमालाला सुद्धा भेटवलं आहे. आता कावेरी आणि किमया खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत. किमया कावेरीला बोलते हे घर छोटं नाही पडत का? पण राजच्या २५ हजार पगारात ह्यापेक्षा मोठं घर कसं परवडणार असं कावेरी म्हणते तेव्हा किमया तिला नोकरी करण्याचा सल्ला देते, रत्नमाला ही सहमत होते पण राज कावेरीला नोकरी करण्यासाठी परवानगी देईल का? राजला हा निर्णय आवडेल का? याचा विचार कावेरी करते. आता कावेरी नोकरी करेल की नाही? हे जाणून घेण्यासाठी नक्की पाहा, ‘भाग्य दिले तू मला’ , महारविवार, २८ जानेवारी, दु. १.०० वा. आणि संध्या. ७.०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading