Monday, October 5, 2026
Latest NewsPUNE

एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनचे पुष्प प्रदर्शन आजपासून नागरिकांसाठी खुले

पुणे : एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनच्यावतीने आयोजित एम्प्रेस गार्डन फ्लॉवर शो बड्स एन ब्लूम्स-2024 प्रदर्शनात पुणेकरांना वेगवेगळ्या फुले पाहण्याची संधी मिळणार आहे. असे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी फार विजयकुमार मगर, पोलीस उपायुक्त, झोन 4 यांनी केले . तसेच पुणेकरांनी या प्रदर्शनाचा लाभ नक्की यावा असे आवाहन ही केले. उद्घााटन प्रसंगी द अ‍ॅग्री – हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया प्रेसिडेंट प्रताप पवार, संस्थेचे मानद सचिव सुरेश पिंगळे, विश्‍वस्त अनुपमा बर्वे, सुमन किलोस्कर, डॉ श्रीनाथ कवडे, प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते.

 एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनच्यावतीने एम्प्रेस गार्डन फ्लॉवर शो बड्स एन ब्लूम्स-2024 आयोजन करण्यात आले असून आज  विजयकुमार मगर, पोलीस उपायुक्त, झोन 4 यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले .   पुष्प प्रदर्शन दि. 25 जाने. ते 28 जाने. 2024 या दरम्यान होत असून, हे प्रदर्शन आज पासून सर्व नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे . 26, 27 आणि 28 जानेवारी रोजी प्रदर्शन सकाळी 9 ते सायं. 7. 30 या वेळेत सुरू राहील. प्रदर्शनात विविध फुले, भाजीपाला, बोन्साय झाडे यांची आकर्षक पद्धतीने सजावट केली. तसेच नर्सरी, शेतीची अवजारे, खते, कुंड्या, बागकामाचे साहित्य, खाद्यपदार्थाचे असे विविध स्टॉल येथे आहेत. सदर पुष्प प्रदर्शनात पाण्याचा हौद बनवून त्यावर फुलांच्या सहाय्याने देवीची प्रतिकृती काढण्यात आली आहे जे पाहण्यास नागरिक गर्दी करित आहेत.

अ‍ॅग्री हॉर्टीकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेमार्फत एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापन केले जाते. बागेचे व्यवस्थापन करीत असताना संस्थेमार्फत नेहमी अनेक विविध समाजपयोगी उपक्रम बागेत राबविले जातात. ज्यायोगे सर्वसामान्य व्यक्तीला निसर्गाबद्दल व पर्यावरणाबद्दल आपुलकी निर्माण होईल व प्रत्येक व्यक्तीला त्यापासून काही विरंगुळा मिळेल या उद्देशाने अ‍ॅग्री हॉर्टीकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया ही संस्था 1830 पासून कार्यरत आहे.दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये संस्थेमार्फत एम्प्रेस गार्डन येथे पुष्प प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. सुरवातीच्या काळात पुष्प प्रदर्शन म्हणजे केवळ ठराविक वर्गाचा विरंगुळा मानला जात होते. मात्र संस्थेने कालानुरूप त्यामध्ये बदल केल्यामुळे आज जे पुष्प प्रदर्शन भरविले जाते त्यामध्ये अबाल- वृद्धांचा सहभाग असतो. सर्वसामान्यांचा पुष्पप्रदर्शनामध्ये अधिक सहभाग वाढविण्यासाठी बागप्रेमींसाठी निरनिराळ्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात. तसेच फुलांची कलात्मक मांडणी, भाजीपाला स्पर्धा, आकर्षक व शोभिवंत पानांच्या कुंड्या तयार करणे, इ. गोष्टींच्या स्पर्धा या निमिताने आयोजित करण्यात येतात. तसेच बागेतील विविध फुले देखील सर्वसामान्य व्यक्ती या प्रदर्शनामधील स्पर्धेत मांडू शकतात. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.केवळ स्पर्धे पुरते मर्यादित न राहता. पुष्प प्रर्दशनानिमित्ताने बागेस भेट देणार्‍या पुष्प रसिकांना नव्याने सजलेल्या एम्प्रेस गार्डनचा देखील आनंद घेता येतो. पुष्प प्रदर्शनानिमित्त दरवर्षी बाग विविध प्रकारच्या उद्यान रचना, आकर्षक कुंड्यांची मांडणी, विविध पानाफुलांची रचनात्मक मांडणी करून आकर्षक रीत्या सजविण्यात येते. त्यामुळेच तर पुष्प रसिक या पुष्प सोहळ्याची वर्षभर आतुरतेने वाट पहात असतात.पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने पुण्यातूनच नव्हे तर अगदी कोल्हापूर, सांगली, नाशिक, आंध्र प्रदेश इ. ठिकाणाहून नर्सरी व्यावसायिक या पुष्पप्रदर्शना मध्ये सहभागी होण्याकरिता येत असतात. पुष्पप्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षण असते ते म्हणजे विविध प्रकारच्या पुष्परचना. यंदाच्या वर्षदिखील) जपानी पध्दतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसेच बोन्साय वृक्षांचे विविध प्रकार स्पर्धकांनी साकारलेल्या विविध कलाकृती या पुष्पप्रेमींच्या पसंतीस नक्कीच उतरतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading