कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणी विठ्ठल शेलार, रामदास मारणे पोलिसांच्या ताब्यात
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या दिवसाढवळ्या झालेल्या खून प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. शरद मोहोळ हत्येप्रकरणी मुख्य आरोपी रामदास मारणे उर्फ वाघ्या आणि गुंड विठ्ठल शेलारसह इतर आरोपींना पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पनवेल पोलिसांनी सर्व आरोपींना पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. शरद मोहोळच्या हत्येचा कट रचण्यात रामदास मारणे उर्फ वाघ्या आणि गुंड विठ्ठल शेलारची मुख्य भूमिका आहे.
शरद मोहोळ हत्येप्रकरणी आतापर्यंत पुणे पोलिसांनी १३ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. शरद मोहोळ हत्येच्या कटातील मुख्य आरोपी रामदास मारणेसह १० आरोपींना अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले. अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींपैकी तीन मुख्य आणि तीन संशयित आरोपी आहेत. पनवेल पोलिसांनी पनवेल येथील एका फार्महाऊसवर कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. आरोपींना पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पुणे पोेलिसांच्या गुन्हे शाखेने शरद मोहोळ हत्या प्रकरणात दहा जणांना पनवेल आणि वाशीमधून अटक केली आहे. विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे यासह दहा जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून अटक केली आहे. शेलार आणि मारणे यांचा शरद मोहोळच्या हत्येचा कट रचण्यात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
