Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

तब्बल ७०,४४५ देशी रोपांच्या विनामूल्य वाटप अभियानाला प्रारंभ

 

पुणे : पर्यावरण पूरक देशी वृक्ष म्हणजेच तुळस, पिंपळ, वावर, कडुलिंब अशा रोपांचे विनामूल्य वाटप करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंती अभिवादन कृती समिती, पुणे च्या वतीने तब्बल ७०,४४५ हून अधिक देशी वृक्षांच्या रोपांचे विनामूल्य वाटप अभियानाचा शुभारंभ महात्मा फुले पेठेतील महात्मा फुले वाडा राष्ट्रीय स्मारक येथे झाला.

स्त्रियांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविणा-या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त हे अभियान राबविले जात आहे. अभियानाचे आयोजन प्रा. नरहरी पाटील, रघुनाथ ढोले, रवि चौधरी, प्रल्हाद गवळी, सारंग सराफ, सुशीला नेटके, बाळासाहेब अमराळे, सचिन विप्र, नंदा पंडीत, सुनीता काळे, विजय रजपूत, बाळासाहेब ढमाले, रुपेश चांदेकर, राजेंद्र भोसले, नीता पालवे यांनी केले आहे.

सावित्रीबाईंच्या जयंतीचे हे १९३ वे वर्ष असून प्रत्येक वर्षीचे ३६५ दिवस याप्रमाणे एकूण ७०,४४५ दिवस पूर्ण होत असून, तेवढी रोपे नागरिकांना देण्यात येणार आहेत. यामध्ये बहावा, दिल का राजा, भेंडी ,सिताफळ, उंबर ,आंबट चिंच, वड ,पळस टिकोमा, शिसवी, जांभूळ ,करंजी ,मोगरा आधी वृक्षप्रजातीचा समावेश आहे. सदर वृक्षांची लागवड व देखभाल लोकसेवा शैक्षणिक संस्था समूहाने मौजे फुलगाव तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी केलेली आहे.

तसेच या समितीत सर्व संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, सभासद, सदस्य सर्व राजकीय पक्षांचे आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक व लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, सहकारी संस्था, जेष्ठ नागरीक संघ, पोलीस मित्र, महिला बचत गट, भजनी मंडळ यांचे कार्यकर्ते अभियानाकरिता काम करणार आहेत. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने अभियानात सहभागी व्हावे. तसेच मोफत रोपांकरिता ९८२२६५२६१९, ९७६३०८१११७ या क्रमांकावर साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading