शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांचा फॅशन शो मध्ये सर्जनशीलतेचा दिमाखदार आविष्कार
पुणे : विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कल्पकतेला आणि तांत्रिक कौशल्याला हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘वामा कृती’ फॅशन शोचा शासकीय तंत्रनिकेतन, पुणे येथे दिमाखदार शुभारंभ झाला. ड्रेस डिझायनिंग अँड गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग विभागाच्या वतीने आयोजित या फॅशन शोमध्ये तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक आणि नावीन्यपूर्ण पोशाखांनी उपस्थितांची मने जिंकली.
फॅशन शोचे उद्घाटन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी फॅशन व गारमेंट उद्योगातील मान्यवर नंदिता गुप्ता, प्रवीण फेगडे, सोनल फेगडे, प्रियदर्शनी गायकवाड आणि तनिष्का सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध कलेक्शनमधून फॅशन डिझाईन, पोशाख निर्मिती, स्टायलिंग, कापडाची निवड, रंगसंगती आणि सादरीकरणाचे कौशल्य प्रभावीपणे दाखवून दिले. आधुनिक फॅशनचा ट्रेंड आणि विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा सुंदर मिलाफ या फॅशन शोमध्ये पाहायला मिळाला.
‘वामा कृती’ फॅशन शोच्या यशस्वी आयोजनासाठी उद्योग क्षेत्रातील विविध मान्यवरांनी दिलेले सहकार्य व मार्गदर्शन विशेष महत्त्वाचे ठरले. प्रवीण फेगडे व सोनल फेगडे – जरी सुता, प्रतीक वाघमारे – ससून युनिफॉर्म वेअर, दत्ता गायकवाड – पीएनजी, ए. व्ही. क्लोदिंग कंपनी – मिनल जोशी, हेमंत मुकुंद – मुकुंद टेक्स्टाईल डिझाईन, गुलमोहर फॅशन स्टुडिओ – गौवर गायकवाड, सुमित तेजवानी – रॉयल लूम्स तसेच कॉम्सलव्ह मीडिया टेक प्रा. लि. – ललित बनसोड यांनी विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन दिले.
या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या कलाकृती अधिक प्रभावीपणे सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळाले. शिक्षण संस्था आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना फॅशन उद्योगातील प्रत्यक्ष कामकाजाची आणि व्यावसायिक अपेक्षांचीही ओळख झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ड्रेस डिझायनिंग अँड गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग विभागप्रमुख डी. डी. अहिरराव यांच्यासह नमिता विजय गोंडाणे, सी. एम. अंबीकर, पी. व्ही. तोसनीवाल, डॉ. एस. एन. शिंदे आणि एस. एम. वाघचौरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विभागाकडून सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असून, त्यांच्या सर्जनशीलतेला चालना देणे, तांत्रिक कौशल्य विकसित करणे आणि व्यावसायिक आत्मविश्वास वाढविण्यावर भर दिला जात आहे.
‘वामा कृती’ फॅशन शो हा फॅशन, सर्जनशीलता, नावीन्य, कौशल्य आणि टीमवर्कचा दिमाखदार उत्सव ठरला. विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला उद्योग क्षेत्राशी जोडणारा हा उपक्रम भविष्यातील कुशल आणि उद्योगाभिमुख फॅशन व्यावसायिक घडविण्यासाठी प्रेरणादायी ठरला.
