Monday, August 31, 2026
ENTERTAINMENTLatest News

दोन भिन्न स्वभाव , दोन नव्या गोष्टी – ‘पारू’ आणि ‘शिवा’

झी मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर एक नवीन प्रोमो सगळ्यांनी पाहिलाच असेल. झी मराठी लवकरच घेऊन येत आहे आपल्या  प्रेक्षकांसाठी दोन सुंदर मालिका  ‘पारू’ आणि ‘शिवा’. दोन नव्या मालिका , दोन नव्या नायिका, दोन नव्या गोष्टी. माणुसकीला जपणारी , आपुलकीने वागणारी,  मनसोक्त हसणारी, नितळ पारू जणू  झरझरणारा अवखळ झरा. अश्या नटखट अवखळ निष्पाप पारूची भूमिका साकारणार आहे ‘शरयू सोनावणे’. अगदी त्याच्या विरुद्ध अन्यायाला भिडणारी, हक्कासाठी लढणारी, बिंधास्त जगणारी, निडर ‘शिवा’ , जणू धगधगता पेटता निखारा. ह्या निखाऱ्याचं नाव आहे ‘पूर्वा अमोघ फडके’. तर अश्या ह्या दोन भिन्न स्वभाव, दोन नव्या गोष्टी प्रेक्षकांना आपलंस करून घेतील ह्यात शंकाच नाही.

येतात तुमाला भेटायला ‘शिवा’ आणि ‘पारू’ लवकरच नवीन वर्ष्यात  तुमच्या लाडक्या झी मराठी वाहिनीवर  !

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading