Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह आणखी ४९ खासदार निलंबित

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Parliament Winter Session) विरोधी पक्षांच्या खासदारांनी केलेल्या गदारोळामुळे आज (19 डिसेंबर) आणखी 49 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. आता या खासदारांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही. दरम्यान आता निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची एकूण संख्या आता १४१ वर पोहोचलेली आहे.

निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, मनीष तिवारी, शशी थरूर, मोहम्मद फैसल, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव, राजीव रंजन सिंह, संतोष कुमार, प्रतिभा सिंह, मोहम्मद सादिक, जगबीर सिंह गिल, महाबली सिंह, एमके विष्णू प्रसाद, फारुख अब्दुल्ला, गुरजीत सिंह औजला, फजलुर रहमान, रवनीत सिंह बिट्टू, दिनेश यादव, के सुधाकरन, सुशील कुमार रिंकू आदी खासदारांचा समावेश आहे.

मागील १६ डिसेंबर रोजी दोन तरूणांकडून संसदेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री किंवा पंतप्रधानांनी सभागृहात उपस्थित राहून निवेदन द्यावं, अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. यायसाठी आवाज उठवणाऱ्या खासजारांचे निलंबन करण्यात आले आहे.

काळा दिवस  – सुप्रिया सुळे 

लोकशाहीच्या संभागृहात लोकशाहीचीत हत्या होत आहे. ज्यांनी कारस्थान केली ते खासदार संसदेत आहेत. अन् जे प्रश्न विचारतात, निवेदन मागतात त्यांना निलंबन केले जात आहे. संसदीय कामकाजातील हा काळा दिवस असून इतिहास पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने खासदारांचे निलंबन झाले आहे.

फोटो – संग्रही

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading