Maratha Reservation : सरकार बोलावणार विशेष अधिवेशन; मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासुन मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चिला जात आहे. शिवाय मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण लागू करण्यासाठी सरकारला दिलेली ‘डेड लाईन’ २४ डिसेंबर ही देखील जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात ( Winter Session of Legislative Assembly) निवेदन केले आहे. यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेणार (Special Assembly Session For Maratha Reservation) असल्याची मोठी घोषणा केली आहे.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मागासवर्ग आयोगाच अहवाल एक महिन्यांत येईल. त्यानंतर फेब्रुवारी मध्ये विशेष अधिवेशन बोलावून आम्ही आरक्षण देवू . तसेच मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवणारा आरक्षण देणार आम्हाला द्यायचे आहे. त्यासाठी क्युरेटिव्ह याचिका हा एक आशेचा किरण आसुन ज्या त्रुटी आहे त्या दूर करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.
विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ओबीसी समाज्याच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी आमची भूमिका आहे. महाराष्ट्राच्या विकासाला मराठा समाजाचा हात आहे. मात्र, काही दिवसांत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात १६ टक्के आरक्षण दिल मात्र सुप्रीम कोर्टात ते रद्द झालं. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत टिकणारे आधिवेशन देण्याचा आमचा हेतू आहे.
