Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

51 गो शाळांना 31 टन गो खाद्यची मदत


पुणे : श्री सालासर हनुमान चालीसा मंडळातर्फे गौ-अन्नकोट व भजन संध्याचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये 51 गोआश्रयस्थानांना 31 टन गो-अन्न प्रदान करण्यात आले. अशी माहिती संयोजक प्रशांत राठी, धीरज मुंदडा, सचिन जाजू, प्रशांत मुंदडा यांनी दिली.
गेल्या 7 वर्षांपासून गो-अन्नदान कार्यक्रम घेतला जात असून यंदाही श्री सालासर हनुमान चालीसा मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील ठिकठिकाणी कसायापासून सुटका करण्यात आलेल्या किंवा रस्त्यावर भटकणार्‍यार गाई मातांचे निस्वार्थपणे पालनपोषण करणार्‍या गो आश्रयस्थानांना गो-खाद्य पुरविण्यात आले. गोयल गार्डन कोंढवा, पुणे येथे रविवारी गो-अन्नकोट व भजन संध्या कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाद्वारे 51 गो आश्रयस्थानांना 31 टन गो अन्न पुरविण्यात आले. भजन संध्या कलाकार विजय जाजू (जयभवानी कीर्तन मंडळ, हैदराबाद) यांच्या सुरेल आवाजाने भजन संध्याची सांगता झाली.

गो-अन्नकोट गो-आश्रयस्थानांना गो-धान्याचे वाटप कृष्णकुमार रामनारायण बुब, शामसुंदर सितारामी कलंत्री, सौ. पुष्पाजी विजयकुमार कासट, महेश हरीनारायण राठी, बंकटलाल राजु दिलीप मुंदडा, विष्णु चमाडिया, नरेश जालान, सौ. आशा जुगल पुंगलिया, सौ. मीना संतोष चोपडा, करण शेखर बाहेती, पवनकुमार बन्सीलाल सोनी, श्री. खरे, संजय चांडक, श्रीराम श्रीकांत सोनी, आयोध्या झुंबरलालजी सार, उज्वला पुनमचंदजी धूत, गणेश भिवराज भुतडा, अ‍ॅड. जगदीश कचोलिया व लक्ष्मीनारायण तापडीया यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading