Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

आपली क्षमता ओळखून योग्य क्षेत्र निवडा आणि मेहनत व जिद्दीने यश संपादित करा- अविनाश बागवे

 

पुणे : आपल्या आयुष्यात बदल घडवायचा असेल तर मेहनत आणि जिद्दी च्या जोरावर परीक्षेत उतुंग यश मिळवा असा विश्वास अविनाश बागवे यांनी शालेय मुलानाक दिला .क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान यांच्या वतीने बापूसाहेब पवार कन्या शाळा, भवानी पेठ, पुणे येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत २१ अपेक्षित संच वाटप करण्यात आला. मा. नगरसेवक अविनाश रमेशदादा बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सन २००५ पासून सलग गेले १८ वर्षे आपल्या भागातील १० वी,- १२ वी च्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना हे संच वाटप केले जातत, तसेच शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीच्या माध्यमातून दहावी व बारावी मध्ये यश कसे संपादित करायचे याबद्दल मार्गदर्शन देखील केले जाते.
दहावी व बारावी हे आपल्या शैक्षणिक करिअरचा पाया असतो. या वर्षाचे गुण ठरवतात की आपण आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, मॅनेजमेंट इत्यादी कुठल्या क्षेत्रात पदवी घेऊ शकतो. त्यामुळे शैक्षणिक करिअर करून चांगली पदवी घ्यायची असेल, तर दहावी व बारावीत चांगले मार्क घेणे आवश्यक असते. आपली क्षमता व आपल्यातले गुण ओळखून आपण आपल्या करिअरच्या क्षेत्राची निवड करावी, तसेच आपल्या मेहनत व जिद्दीच्या जोरावर यश संपादित केले पाहिजे. मी परदेशात जाऊन शिकू शकलो, आपणही उच्चशिक्षित व्हावे या हेतूने २००५ पासून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत असे मत  अविनाश बागवे यांनी व्यक्त केले.

निमित्त काहीही असो आमच्या शाळेला नेहमी मदत करतात व विद्यार्थ्यांना, शालेय व्यवस्थापनाला मा अविनाशजींचा नेहमी एक आधार राहिला आहे, असे मत शाळेचे मुख्याध्यापिका सौ.साळवी मॅडम यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक विठ्ठल थोरात यांनी केले, सूत्रसंचालन  दयानंद अडगले, तर आभार  सुनील बावकर यांनी मानले,. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयदीप शेलार, हुसेन शेख, अरुण गायकवाड, संजय साठे, मारुती कसबे, आदित्य गायकवाड व इतर यांनी विशेष प्रयत्न घेतले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading