Monday, August 31, 2026
BusinessLatest News

एल अॅण्ड टी फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेड (एलटीएफएच) मध्ये उपकंपन्यांचे विलीनीकरण पूर्ण


पुणे : शेअरबाजारात सूचीबध्द असलेल्या एल अॅण्ड टी फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेड (एलटीएफएच) या होल्डिंग कंपनीने आज एल अॅण्ड टी फायनान्स लिमिटेड (एलटीएफ), एल अॅण्ड टी इन्फ्रा क्रेडिट लिमिटेड (एलटीआयसीएल) आणि एल अॅण्ड टी म्युच्युअल फंड ट्रस्टी लि.चे यांचे स्वतःशी विलीनीकरण यशस्वीरित्या पूर्ण केल्याची घोषणा आज येथे केली. एलटीएफएच ही एक आघाडीची एनबीएफसी आहे आणि एल अॅण्ड टी फायनान्स ब्रँड अंतर्गत विविध वित्तीय उत्पादने आणि सेवा प्रदान करते. एलटीएफएच ही होल्डिंग कंपनी असुन तर एलटीएफ आणि एलटीआयसीएल या उच्च मूल्याच्या कर्ज सूचीबद्ध कंपन्या कार्यरत आहेत. या विलीनीकरणामुळे, सर्व कर्ज देणारे व्यवसाय एकाच कंपनीअंतर्गत म्हणजेच एलटीएफएच अंतर्गत राहतील आणि शेअरबाजारात सूचीबद्ध असलेली कर्जवाटप करणारी कार्यरत कंपनी म्हणून तिची ओळख राहणार आहे.

संबंधित कंपन्यांच्या संचालक मंडळांनी जानेवारी २०२३ मध्ये प्रस्तावित विलीनीकरणास मान्यता दिली होती आणि भागधारक, कर्जदार आणि नियामक/ वैधानिक प्राधिकरणे अर्थात भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय), नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (एनसीएलटी), सिक्युरिटीज अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी), आणि शेअर बाजार यांच्याकडून आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित प्रक्रिया पूर्ण झाली.

विलीनीकरणाबाबत आपले मत व्यक्त करताना एलटीएफएचचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री. दिनानाथ दुभाषी म्हणाले, मला हे जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे की, सर्व आवश्यक मंजुरी मिळून विलिनीकरण निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण झाले आहे. हे विलीनीकरण आमची कंपनी गेल्या सात वर्षांपासून राबवत असलेल्या ‘योग्य संरचना’ धोरणाच्या अनुषंगाने आम्ही हाती घेतलेल्या प्रमुख धोरणात्मक उपक्रमांपैकी एक आहे आणि यामुळे एनबीएफसीची संख्या आता आठवरून एकावर आली आहे. इनव्हेस्टमेंट अॅण्ड क्रेडिट कंपनीची नोंदणी तसेच एका नॉन-ऑपरेटिंग घटकाचे एलटीएफएचमध्ये विलीनीकरण यातून एकाच एनबीएफसीत कर्ज देणार्‍या दोन घटकांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय हा प्रामुख्याने बाजारातील गतिशीलता, अंतर्गत समन्वय आणि शाश्वत वाढीचा दृष्टीकोन यांचा काळजीपूर्व विचार करून घेण्यात आलेला आहे. आम्हाला विश्वास आहे की या विलीनीकरणातून वाढ, नावीन्य आणि दीर्घकालीन यशासाठी नवीन मार्ग उघडण्यात आम्ही सक्षम होऊ. या सर्व फायद्यांमुळे उत्कृष्ट प्रशासन पध्दत अस्तित्वात येऊन सर्व भागधारकांसाठी शाश्वत मूल्यनिर्मिती होईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading