“दहा वाजून..दहा मिनिटे” …चर्चा निष्ठावंताशी
पुणे: शरदचंद्रजी पवार यांच्या सोबत गेल्या पाच दशकांपासून कायम सोबत राहिलेल्या निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या मुलाखतीचे सत्र “दहा वाजून दहा मिनिटे” या सदराखाली चालू होत आहे. ‘राष्ट्रवादी पुणे शहर सोशल मीडिया फ्रंट’ टीमच्या वतीने नुकतेच शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत ‘ शरद पवार यांच्या हस्ते सदर पोस्टरचे उद्घाटन करण्यात आले.
“दहा वाजून दहा मिनिटे’ सदरात माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राजकीय व सामाजिक प्रवासात जोडल्या गेलेल्या हजारो निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते मंडळींशी या निमित्ताने हितगुज होणार असून प्रत्येकाचे अनुभव या निमित्ताने आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष मा. प्रशांतदादा जगताप, पुणे शहर राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्ष रविंद्र कळमकर, उपाध्यक्ष स्वप्निल धावडे, संघटक मुन्ना शेख, सरचिटणीस दिग्विजय पाटील, समन्वयक पुजा काटकर, वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सागर धाराशिवकर, हडपसर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष हितेश घोडके, कार्याध्यक्ष अझिम मिर्झा, खडकवासला विधानसभा मतदारसंघ कार्याध्यक्ष अक्षय पवार, मा. इमाद शेख, मा. सोहेल शेख व मान्यवर उपस्थित होते.
