fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे – रामदास आठवले

पुणे :- मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ,परंतु ओबीसी च्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी भूमिका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली .पुढे ते म्हणाले की ,छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांनी आपापसातील वाद मिटवावे . केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज पुण्यातील विश्रामगृह येथे पत्रकाराची संवाद साधला यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठी सरकारने प्रयत्न करावे..मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठी छगन भुजबळ आग्रही आहे ..मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठी योग्य असे काम चालू आहे...जातीयवाद समाजातून संपला पाहीजे.. जात निहाय जनगणना केली पाहिजे.. तामिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ओबीसी मधून मिळालेले आरक्षण हे कोर्टामध्ये टिकणार नाही जरांगे पाटील व छगन भुजबळ यांनी आपापसातील वाद मिटवावा भीमा कोरेगाव येथे भव्य स्मारक व्हावे यासाठी आमचा समाज अग्रेसर राहणार आहे 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये जर आमचे सरकार आले तर भारत महासत्ता बनण्याशिवाय राहणार नाही.. नवीन संसद भवनला दिल्ली येथे संविधान भवन असे नाव देणार आहोत . या पत्रकार परिषदेस रिपब्लिकन नेते परशुराम वाडेकर ,बाळासाहेब जानराव ,मंदार जोशी , विरेन साठे ,यासह रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

%d