fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNE

‘स्मार्ट अभ्यास’ हाच दहावीतील सक्सेस मंत्रा – मंजू फडके

पुणे : जग दिवसेंदिवस अधिक स्पर्धात्मक होत आहे. अशावेळी विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये वेगळेपणा दाखवणे गरजेचे आहे. हे वेगळेपण केवळ ‘हार्ड वर्क’ करून येणार नाही, तर त्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘स्मार्ट वर्क’ केले पाहिजे. स्मार्ट पद्धतीने अभ्यास करून विषय समजून घेणे आणि त्यानुसार कोणत्याही ताणतणावाशिवाय परीक्षा देणे, हाच खऱ्या अर्थाने दहावीतील सक्सेस मंत्रा आहे, असे मत रोटरी क्लब ३१३१ च्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व व्याख्यात्या मंजू फडके यांनी व्यक्त केले.

रोटरी क्लब ऑफ पुणे युवा आणि सुपरमाईंडच्या वतीने इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी ‘दहावी सक्सेस मंत्रा’ या विनामूल्य कार्यक्रमाचे आयोजन कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ पुणे युवाचे अध्यक्ष निनाद जोग, श्रीकांत जोशी, अर्चिता मडके, दीपा बडवे, क्लबचे इतर पदाधिकारी व सदस्य आदी उपस्थित होते.

मंजू फडके म्हणाल्या, स्पर्धा कोणत्या बाजूने येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कायम स्पर्धेसाठी तयार राहिले पाहिजे. दहावी हा केवळ आपल्या शैक्षणिक करिअरचाच नव्हे तर संपूर्ण आयुष्याचा पाया असतो. यानंतरच तुमच्या आयुष्याला योग्य दिशा मिळणार आहे. त्यामुळे दहावी मध्ये मजा मस्ती न करता आता जर तुम्ही कष्ट करून अभ्यास केला तरच तुम्हाला चांगले करिअर मिळू शकेल.

निनाद जोग म्हणाले, दहावी मध्ये असताना मुलांबरोबर पालकांनाही त्यांच्या भविष्याची चिंता असते. दोघांच्याही चिंतेचे निराकरण वेगवेगळ्या पद्धतीने करता येऊ शकते. त्यासाठीच अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमामधून पालकांचे व विद्यार्थ्यांचे मार्कंचे टेन्शन कमी होते व विद्यार्थ्यांना मोटिव्हेशन मिळते.

गेले सात वर्षे सातत्याने हा उपक्रम राबविला जातो. 40-50% पासून 90-95% पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या सेमिनारच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळते. म्हणूनच या कार्यक्रमाला दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. असे क्लबचे माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या विज्ञान विषयाच्या सदस्या डॉ. सुलभा विधाते यांनी विज्ञान विषयावर, मंजुषा वैद्य यांनी आयएमपी स्टडी टेक्निक आणि डॉ. जयश्री अत्रे यांनी गणित विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दीपा बडवे व अर्चिता मडके यांनी सूत्रसंचालन केले व आभार दिनेश अंकम यांनी मानले

Leave a Reply

%d