‘ही’ अभिनेत्री साकारणार अटल बिहारी वाजपेयी यांच्या आईची भूमिका
एण्ड टीव्हीने त्यांची नवीन मालिका ‘अटल’ची घोषणा केली आहे. ही मालिका दिवंगत पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या बालपणीच्या कुणाला माहित नसलेल्या पैलूंना सादर करण्यास सज्ज आहे. या मालिकेची घोषणा झाल्यापासून इंडस्ट्रीमध्ये प्रमुख पात्रांसाठी निवडण्यात आलेल्या कलाकारांबाबत बरीच चर्चा सुरू आहे. नुकतेच असे ऐकण्यात आले आहे की, लोकप्रिय टेलिव्हिजन व अनुभवी अभिनेत्री नेहा जोशी यांना अटल यांच्या आई कृष्णादेवी वाजपेयीची भूमिका साकारण्यासाठी निवडण्यात आले आहे. युफोरिया प्रॉडक्शन्सद्वारे निर्मित ही मालिका भारताच्या भवितव्याला आकार देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या या नेत्याच्या सुरूवातीच्या काळाला दाखवणार आहे. भारतातील ब्रिटीश वसाहतवादी राजवटीच्या पार्श्वभूमीवर स्थित ही मालिका अटलबिहारी वाजपेयी यांच्या बालपणाला सादर करेल. तसेच घटना, विश्वास व आव्हानांवर प्रकाश टाकेल, ज्यामुळे ते महान नेते ठरले.
आपल्या भूमिकेबाबत सांगताना नेहा जोशी म्हणाल्या, ”अटल यांच्या आई कृष्णादेवी वाजपेयीची महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने मला किती सन्माननीय वाटत आहे हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. कृष्णादेवी यांना इतिहास आणि राजकारणाची आवड होती व त्या त्यांचे पती वाजपेयीजी यांच्या एकनिष्ठ समर्थक बनल्या. त्या संपूर्ण जीवन स्वत:च्या कुटुबाशी संलग्न राहिल्या, पतीच्या निर्णयांमागे ठामपणे उभ्या राहिल्या. प्रबळ संकल्प आणि सखोल धार्मिक निश्चयासह त्यांनी ब्रिटीश वसाहतवादी राजवटीला मूकपणे विरोध केला, भारताला स्वातंत्र्य मिळण्याची इच्छा व्यक्त केली. कृष्णा आधारस्तंभ आहेत, ज्यांच्यावर त्यांचा मुलगा अटल अवलंबून आहे. अटल यांच्यामधील निरंतर दृष्टिकोन आणि यथास्थितीबाबत प्रश्न विचारण्याची वृत्ती त्यांना त्यांच्या आईकडून वारशामध्ये मिळाली आहे. ती कदाचित जगासमोर तिची मते व्यक्त करू शकत नाही, पण आपला प्रिय देश भारताला स्वातंत्र्य मिळण्याची इच्छा व्यक्त करते. तिच्या कुटुंबाप्रती तिची समर्पितता, राजवटी अत्याचाराविरोधात आवाज आणि स्वत:च्या मुलाच्या भविष्याला आकार देण्यामधील प्रभावी भूमिका हे गुण कृष्णाला अपवादात्मक भूमिका बनवतात.”
मालिका ‘अटल’च्या कथानकाबाबत सांगताना नेहा जोशी पुढे म्हणाल्या, ”कथानक विश्वास, मूल्य व विचारसरणीवर मोठा प्रभाव टाकलेल्या त्यांच्या आईसोबतच्या त्यांच्या नात्याला दाखवेल. एकीकडे भारत ब्रिटीश राजवटीत गुलामगिरीचा सामना करत होता, तर दुसरीकडे अंतर्गत वादविवाद व संपत्ती, जात, भेदभाव याला तोंड देत होता. अटल यांच्या आईने अखंड भारताची संकल्पना केलेले स्वप्न हे त्यांनी मनापासून जपले होते. मालिकेचे कथानक विनम्र कुटुंबातील प्रामाणिक मुलगा आणि भारताचे महान नेते अटलबिहारी वाजपेयी यांची प्रेरणादायी कथा सादर करते.”
पहा नेहा जोशी यांना कृष्णादेवी वाजपेयीच्या भूमिकेत मालिका ‘अटल’मध्ये, जी सुरू होत आहे ५ डिसेंबरपासून रात्री ८ वाजता फक्त एण्ड टीव्हीवर!