एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लि.कडून विस्तारीकरण व विकासावर लक्ष केंद्रित करत पुण्यामध्ये दुसऱ्या कार्यालयाचे उद्घाटन
पुणे: एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लि. या भारतातील आघाडीच्या विमा कंपनीने पुण्यातील चिंचवड भागामध्ये आपल्या दुसऱ्या कार्यालयाच्या उद्घाटनासह विस्तारीकरण व विकासाच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. हे विस्तारीकरण कंपनीच्या प्रवासामधील लक्षणीय टप्पा आहे, ज्यामधून समाजातील सर्व विभागांसाठी विमा उपलब्ध करून देण्याप्रती कंपनीची अवरित कटिबद्धता दिसून येते. तसेच हे विस्तारीकण सरकारने आखलेला दृष्टीकोन ‘२०४७ पर्यंत सर्वांसाठी विमा‘च्या महत्त्वाकांक्षी ध्येयाशी संलग्न आहे.
एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. किशोर कुमार पोलुदासू यांच्या हस्ते शाखा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रमुख महाव्यवस्थापक (महाराष्ट्र सर्कल) श्री. अरविंद कुमार सिंग, स्टेट बँक ऑफ इंडिया – एओ पुणेचे उप महाव्यवस्थापक श्री. सतिश कुमार, एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लि.च्या वेस्ट १ चे प्रादेशिक प्रमुख श्री. विकास बागई आणि स्टेट बँक ऑफ इंडिया व एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लि.चे इतर मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन करण्यात आलेले पुण्यातील दुसरे शाखा कार्यालय विमा जागरूकता व पोहोचमध्ये वाढ करते. या कार्यालयामधून पुण्यातील आणि आसपासच्या भागांमधील व्यक्तींचे जीवन व मालमत्तांचे संरक्षण करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.
एसबीआय जनरल इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर कुमार पोलुदासू म्हणाले, ”आम्हाला पुण्यामध्ये आमच्या दुसऱ्या कार्यालयाचे उद्घाटन करण्याचा आनंद होत आहे. या उद्घाटनाचा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत किफायतशीर दरामध्ये सामान्य विमा उपलब्ध करून देण्याचा मुलभूत उद्देश आहे. पुणे आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि हे नवीन कार्यालय आम्हाला प्रदेशामध्ये विम्याबाबत अधिक जनजागृती करण्यास मदत करेल, तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला पाठिंबा देईल. या विस्तारीकरणामधून ग्राहकांप्रती आमची कटिबद्धता दिसून येते, तसेच हे विस्तारीकरण आम्हाला या गतीशील प्रदेशामध्ये विमा उत्पादने व सेवांप्रती वाढत्या मागणीची उत्तमप्रकारे पूर्तता करण्यास सक्षम देखील करते. आम्ही दर्जात्मक ग्राहक सेवा देत राहू आणि विमा सोल्यूशन्स सर्वांना सहजपणे उपलब्ध असण्याची खात्री घेण्याचा प्रयत्न करू.”
या कार्यालयाचे उद्घाटन कंपनीच्या प्रवासामधील महत्त्वाचा टप्पा आहे आणि प्रदेशामधील सर्वात विश्वसनीय व पसंतीची विमा प्रदाता बनण्याचा कंपनीचा दृष्टीकोन संपादित करण्याप्रती मोठे पाऊल आहे.