fbpx
Thursday, December 7, 2023
ENTERTAINMENTLatest News

भाऊबीजे च्या दिवशी निशीसाठी आली लग्नाची मागणी

 

‘सारं काही तिच्यासाठी’ ह्या मालिकेत निशीचा संघर्ष चालूच आहे. आपले बॅडमिंटन खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्याकरीता तिचे सगळे प्रयत्न सुरु आहेत. दिवाळीच्या दिवशी ही निशाला सरावासाठी जावं लागणार म्हणून निशी आणि ओवी टेन्शन मध्ये आहेत. त्यात लक्ष्मीपूजनच्या दिवशी निशी घरातून गायब असल्याने घरात गोंधळ होणे आणि ती पकडली जाता जाता वाचणे ह्या सर्व गोष्टी वादळ येण्यापूर्वीची शांतता आहे. दिवाळीचा पाडवा निशी आणि ओवीसाठी आनंद घेऊन येणार आहे कारण ओवीसाठी श्रीनूकडून आणि नीरज कडून निशीला काही तरी खास भेट मिळणार आहे. पण हे सुखाचे क्षण त्या दोघी जास्त वेळ जगू नाही शकणार नाहीत, कारण दाईची आणि लाली भाऊबीजेच्या दिवशी निशीसाठी लग्नाची मागणी घालणार आहेत जे ऐकून निशी आणि ओवीच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. 

काय होणार जेव्हा सर्वांसमोर उघड होईल निशीच्या आणि ओवीच्या प्रेम संबंध बद्ल ? काय असेल श्रीनूच उत्तर ?  निशीच्या बॅडमिंटन खेळण्याच्या स्वप्नावर लागेल का पूर्णविराम? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘सारं काही तिच्यासाठीच्या’ येणाऱ्या आठवड्यात  पाहायला मिळेल सोमवार ते शनिवार संध्या.  ७: ३० वा. फक्त झी मराठीवर.

 

Leave a Reply

%d