fbpx
Thursday, December 7, 2023
ENTERTAINMENTLatest News

पंचपिटिकाच्या दुसऱ्या पेटीत इंद्राणी आणि नेत्राच्या तत्वांचे रहस्य !

 

झी मराठीच्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत  पंचपिटिका रहस्य मध्ये पुढे काय होणार ह्याची सर्वानाच उत्सुकता आहे. पहिल्या पेटीच रहस्य सर्वांसमोर  उलघडले आहे, पण दुसरी पेटी कोणाच्या हाती लागणार आणि त्यातून काय रहस्य बाहेर येणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असेल. वावोशी गावातील स्मशानात दुसरी पेटी आहे पण तिथे प्रेत जळत असल्यामुळे त्या दोघींना पेटी बाहेर काढता येत नाही. थोडा वेळ वाट पाहून दोघी पेटी काढण्याचा प्रयत्नात असताना रूपाली तिथे येते आणि इंद्राणी-नेत्राला त्याच जागी जाळून मारण्याचा प्रयत्न करते. खूप प्रयत्न केल्या नंतर दुसऱ्या पेटीचा ताबा इंद्राणी-नेत्राला मिळतो. या दुसऱ्या पेटीच्या मिळण्याने इंद्राणीला तिच्या कलियुगात असण्याचा अर्थ कळतो. पेटीमध्ये इंद्राणीसाठी एक मजकूर असतो जे वाचून तिला कळत की इंद्राणी आणि नेत्राचं सोबत असणं एका खास गोष्टीसाठी गरजेच आहे. पहिल्या दोन पेट्या इंद्राणी आणि नेत्राच्या हाती लागल्या आहेत हे बघून रुपालीच रक्त खवळत आणि ती मनात गाठ बांधते कि तिसरी पेटी ती त्यांच्या हाती लागू देणार नाही.

 

इंद्राणीला आणि नेत्राला पंचपीटीकेतल्या दुसऱ्या पेटीमधून कोणतं रहस्य उलगडणार? की आणखी काही प्रश्न निर्माण होणार? यासाठी पाहात राहा ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वा. आपल्या  झी मराठीवर.  

Leave a Reply

%d