fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

सहारा इंडियाचे संस्थापक सुब्रत रॉय यांचे निधन

मुंबई : सहारा इंडिया परिवारचे संस्थापक सुब्रत रॉय यांचे निधन झाले आहे. सुब्रत रॉय हे 75 वर्षाचे होते. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात सुब्रत रॉय यांनी अखेरचा श्वस घेतला. सुब्रत रॉय यांना 12 नोव्हेंबर रोजी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुब्रत रॉय यांना 14 नोव्हेंबर रोजी रात्री 10.30 वाजता कार्डियाक अरेस्ट आला होता, अशी माहिती सहारा इंडिया परिवारने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून दिली.

सुब्रत रॉय यांचा जन्म 10 जून 1948 रोजी बिहारमधील अररिया जिल्ह्यात झाला. सुब्रत रॉय यांचे प्राथमिक शिक्षण हे कोलकाता येथे झाले. यानंतर सुब्रत रॉय हे उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे तांत्रिक संस्थेतून मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेऊन करिअरला सुरुवात केली. सुब्रत रॉय यांना लहानपणापासून क्रिकेटची आवड होती. यामुळे सुब्रत रॉय यांनी इंडियाची स्पॉन्सरशिप घेतली. अनेक वर्ष सहारा ही टीम इंडियाची स्पॉन्सर होते.

सुब्रत रॉय यांनी 1978 मध्ये सहारा इंडिया परिवारची स्थापना केली. सुब्रत रॉय यांनी रिअल इस्टेट, मीडिया, हॉस्पिटॅलिटी आणि फायनान्स अशा विविध क्षेत्रांत एक मोठे साम्राज्य निर्माण केले. सुब्रत रॉय यांनी दोनशे रुपयांची गुंतवणूक केली होती. यानंतर चिटफंड कंपनी सहारा फायनान्स उघडून त्यांनी त्यांच्या मित्रासोबत पॅरा बँकिंग सुरू केली. या कंपनीमध्ये 100 रुपये कमावणाऱ्या रिक्षाचालक, कपरे धुणारे आणि टायर दुरुस्त करणाऱ्यांकडून दररोज 20 रुपयांची छोटी रुक्कम गोळा करत गुंतवायला सुरुवात केली. यानंतर सुब्रत रॉय यांचा चिटफंड कंपनी देशांच्या कानाकोपऱ्यात पोहचली. यामुळे सहारा इंडिया परिवाराला लाखो लोक गुंतवणूक केल्याने सुब्रत रॉय यांनी मोठी कमाई केली.

यानंतर सुब्रत रॉय यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्या कंपनीच्या दोन संचालकांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. तर सुब्रत रॉय यांना तिहार तुरुंगात फाटवण्यात आली. या प्रकरणी दोन वर्षानंतर सुब्रत रॉय यांना जामीन देखील मिळाला होता. या प्रकरणी सहाराच्या गुंतवणूकदारांना कोट्यावधी रुपये परत करण्याच्या सेबीच्या मागणी होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सहारा-सेबी रिफंड खातेही स्थापन केले आहे.

Leave a Reply

%d