नवे टायटन ट्रॅव्हलर: रनिंग कोर्सेस आणि बिल्ट-इन जीपीएससोबत भारतातील पहिले फिटवर्स स्मार्टवॉच
मुंबई: फिटनेस आणि नावीन्य यांच्या असामान्य अनुभवासाठी सज्ज व्हा, कारण टायटन स्मार्ट वेयरेबल्सने सादर केले आहे एक क्रांतिकारी आश्चर्य: द टायटन ट्रॅव्हलर. भारतीय ग्राहकांच्या धावण्याच्या अनुभवात आणि फिटनेसमध्ये क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेले हे स्मार्टवॉच धावण्याच्या बाबतीत अतिशय काटेकोर आणि उत्साही असलेल्या, सध्याच्या आधुनिक काळातील व्यक्तींना सक्षम बनवते, त्यांचे प्रशिक्षण व कामगिरीमध्ये सुधारणा घडवून आणते. फिटनेस आणि तंत्रज्ञानाचा मिलाप असलेले टायटन ट्रॅव्हलर सक्रिय शहरी व्यावसायिक, मॅरेथॉनसाठी इच्छुक व्यक्तींसाठी बनवण्यात आले आहे. सध्याच्या काळात काम, कुटुंब आणि व्यक्तिगत फिटनेस उद्दिष्ट्ये यांच्यामध्ये संतुलन राखणे खूप जिकिरीचे बनले आहे, टायटन ट्रॅव्हलरच्या साथीने या सर्व आव्हानांवर मात करता येईल.

शारीरिक आणि व्हर्च्युअल डोमेन्सना सहजपणे जोडणारे “रन विथ टायटन फिटवर्स” हे वैशिष्ट्य भारतात प्रथमच सादर केले जात आहे. अतिशय क्रांतिकारी “रन विथ फिटवर्स” धावण्याच्या अनुभवाची व्याख्या नव्याने रचत तुम्हाला तुमच्या शारीरिक कामगिरीच्या उत्तुंग शिखरापर्यंत घेऊन जाते. तुम्ही स्वतःच्या मर्यादांशी स्पर्धा करावी, स्वतःला आव्हान द्यावे यासाठी हे वैशिष्ट्य तुम्हाला सक्षम बनवते, परिणामी धावण्याच्या अनुभवत वाढ होते. फिटनेस जगतात हा एक नवा परिवर्तनात्मक अध्याय सुरु होत आहे. टायटन स्मार्ट वर्ल्ड ऍपमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचा व्हर्च्युअल अवतार देखील निवडू शकता. या डिजिटल काउंटरपार्टसोबत धावत असताना तुम्हाला व्हर्च्युअल जगासोबत अनोख्या संवादाचा अनुभव घेता येतो, रोमांचक फिटनेस अनुभव निर्माण करता येतो. हे अभिनव वैशिष्ट्य वास्तविक व व्हर्च्युअल जगांमधील सीमारेषा पुसट करते, त्यामुळे हे फिटनेस विश्वातील अद्वितीय नावीन्य ठरले आहे.
भारतीय ग्राहकांच्या फिटनेस प्रवासाला अधिक प्रगत बनवण्यासाठीच्या क्षमतांनी सुसज्ज असलेल्या या स्मार्टवॉचमध्ये बिल्ट-इन रनिंग कोर्सेस आहेत, त्यामध्ये सहा मिनिटांच्या इंट्रोडक्टरी रन्सपासून एकोणतीस मिनिटांच्या ट्रान्सफॉर्मेटिव्ह रनिंग अनुभवाचा समावेश आहे. विविध वयोगटातील युजर्सना उपयुक्त ठरतील अशा विविध गोष्टी यामध्ये आहेत. डिफॉल्ट सिलेक्शनमध्ये वेगवेगळ्या कालावधीचे सहा रनिंग कोर्सेस आहेत, यामध्ये धावणे आणि चालणे यांचे मिश्रण असलेले विविध ट्रेनिंग मोड आहेत. सहजसोप्या आणि प्रोफेशनल अशा दोन्ही प्रकारच्या रनिंग व ट्रेनिंग ऍक्टिव्हिटीजसाठी प्रायमरी, मिडीयम आणि ऍडव्हान्स मोडमध्ये विविध बिल्ट-इन कोर्सेससह फिटनेस उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी हे स्मार्टवॉच तुमच्या शरीराला प्रशिक्षण पुरवते
टायटन स्मार्ट वेयरेबल्सच्या सिद्धांताला अनुसरून टायटन ट्रॅव्हलरमध्ये अचूकता व वैयक्तिकरणाचा मिलाप साधण्यात आला आहे. फिटनेसची वाटचाल सुरु करायची असो किंवा ऍडव्हान्स्ड स्तरावर पोहोचल्यावर स्वतःला नवनवीन आव्हाने देऊन कामगिरीमध्ये सातत्याने सुधारणा करायची असो, टायटन ट्रॅव्हलर तुमच्या सर्व गरजा पूर्ण करते. आधुनिक जीपीएस ट्रॅकिंगचा समावेश करण्यात आलेला असल्याने तुमच्या प्रगतीचे अचूक मॉनिटरिंग केले जाते, रिअल-टाइम व्हॉइस प्रॉम्प्टस तुम्हाला प्रत्येक वाटचालीत मार्गदर्शन करतात. ही यंत्रणा फक्त धावण्यावर लक्ष केन्द्रित करते असे नाही तर व्हीओ२ आणि दिवसाचे २४ तास हार्ट रेट मॉनिटरिंगमार्फत तुमच्या आरोग्यावर देखील देखरेख करते. सुचवण्यात आलेल्या रेन्जपासून तुम्ही हटत असाल तर तुम्हाला सूचना देते आणि ऍनिमेशन्समार्फत पोस्ट-रन स्ट्रेचेस देखील पुरवते. व्यायाम केल्यानांतर शरीराला पूर्वस्थितीत यायला वेळ देणे महत्त्वाचे असते हे जाणून टायटन ट्रॅव्हलर खूप महत्त्वाची माहिती पुरवते ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पुढील वर्कआउट सेशनचे नियोजन करण्यात मदत मिळते. अतिशय नाविन्यपूर्ण आणि प्रभावी क्षमतांमुळे टायटन ट्रॅव्हलर हे प्रीमियम वेयरेबल विभागातील अशाप्रकारचे अनोखे डिव्हाईस ठरले आहे.

हे अमोल्ड स्मार्टवॉच अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला तुमच्या बोटांवर उपलब्ध करवून देते. गोल सेटिंग, बिल्ट-इन जीपीएस, २४X७ हेल्थ मॉनिटरिंग, सिंगलसिंक बीटी कॉलिंग आणि अलेक्सा यासारखी प्रगत वैशिष्ट्ये तुमच्या दैनंदिन संवादांमध्ये खूप सहजता आणि सुविधा आणतात. टायटन ट्रॅव्हलर तुमची फिटनेस वाटचाल एका नव्या उंचीवर घेऊन जाते, इतकेच नव्हे तर तुम्हाला प्रोत्साहित करते आणि हे देखील सुनिश्चित करते की धावायला न जाण्यासाठी तुम्ही यापुढे कोणतीच कारणे देणार नाही.
ऍम्बिएन्ट नॉइज ट्रॅकिंग, ताणतणाव व्यवस्थापन आणि एसपीओ२ ट्रॅकिंग या अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी हे स्मार्ट वॉच परिपूर्ण आहे. आरोग्याविषयी अतिशय अचूक माहिती मिळवण्यासाठी हे डिव्हाईस योग्य असल्याने, आरोग्य मूल्यांकनाच्या केंद्राला आकार प्रदान करते.
स्ट्रावा कनेक्टमध्ये व्यायाम ट्रॅकिंगला सोशल नेटवर्किंग फीचर्ससोबत जोडले जाते, त्यामुळे तुम्ही तुमच्या फिटनेसच्या आकडेवारीचे ट्रॅकिंग करू शकता आणि तपशीलवार माहिती मिळवू शकता. जीपीएस वॉचेस, स्मार्टवॉचेस आणि सायकलिंग कम्प्युटर्स अशा सातत्याने वाढत जात असलेल्या लोकप्रिय डिव्हायसेसशी कॉम्पॅटिबल असलेले हे वैशिष्ट्य वापरून युजर्स स्ट्रावाच्या प्रभावी प्लॅटफॉर्ममार्फत वर्कआउट्स सिंक करू शकतात, आपले यश इतरांपर्यंत पोहोचवू शकतात आणि इतर फिटनेसप्रेमींसोबत कनेक्ट करू शकतात.
व्यावसायिकांच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये इव्हेन्ट रिमाइंडर्स, मल्टी-स्पोर्ट मोड आणि १०० पेक्षा जास्त गाणी स्टोर करण्याची क्षमता यामुळे फिटनेस वाटचालीत सातत्य राखणे, नवनवीन उत्तुंग टप्पे गाठणे शक्य होते. या उद्योगक्षेत्रात प्रथमच सादर करण्यात आलेले क्विक रिप्लाय फीचर एसएमएस, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हाट्सअप आणि एफबी मेसेंजर यासारख्या सोशल ऍप्सपर्यंत पोचून तुमच्या कम्युनिकेशन अनुभवात क्रांती घडवून आणते. तुमच्या फोनच्या मेसेजिंग ऍपसोबत कनेक्टेड असल्याने तुम्ही स्मार्टवॉचमध्ये स्टोर्ड असलेले वैयक्तिक, इन-बिल्ट मेसेजेस थेट तुमच्या मनगटावरून थेट शेअर करू शकता. सुविधाजनक कनेक्शनमध्ये हा एक नवा मापदंड ठरणार आहे.
टायटन कंपनी लिमिटेडचे वेयरेबल डिव्हिजनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री रवि कुप्पुराज यांनी सांगितले, “टायटनमध्ये आम्ही नावीन्य आणण्यासाठी अथक प्रयत्नशील असतो, त्यासाठी संशोधन आणि विकास सातत्याने करत असतो. प्रीमियम वेयरेबल तंत्रज्ञानामार्फत ग्राहकांना मिळणाऱ्या वेलनेस आणि फिटनेस अनुभवात परिवर्तन घडवून आणणारे असाधारण नावीन्य सादर करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आम्ही उचलत आहोत. फिटवर्स आणि रनिंग कोर्सेस यासारखी वैशिष्ट्ये ही केवळ एक सुरुवात आहे. सीमा रुंदावून या उद्योगक्षेत्रात नवी मानके स्थापित करण्यासाठी आम्ही बांधील आहोत. आमच्या ग्राहकांच्या जीवनात उन्नती घडवून आणावी हे आमचे उद्दिष्ट आहे.”
वेळ ही सर्वात मोठी लक्झरी आणि फिटनेस ही सर्वात मोठी गरज असलेल्या सध्याच्या काळात टायटन ट्रॅव्हलरची एसिक्स या ऍथलेटिक फूटवेयर, कपडे आणि ऍक्सेसरीजमधील जागतिक पातळीवरील लीडरसोबत भागीदारी आमूलाग्र परिवर्तन घडवून आणेल. टायटन ट्रॅव्हलरच्या प्रत्येक खरेदीसोबत ग्राहकांना एसिक्सच्या उत्पादनांवर विशेष १०% सूट मिळेल. आपल्या प्रत्येक वाटचालीत एक एक्स्ट्रा टप्पा गाठण्यासाठीच्या आधुनिक फिटनेसप्रेमींच्या उत्साहाला अनुरूप अशी ही ऑफर असल्याने सगळ्यांनाच ती खूप आवडेल.
एसिक्सचे भारत आणि दक्षिण आशियाचे मॅनेजिंग डायरेक्टर . रजत खुराना यांनी सहयोगाबद्दल सांगितले, “नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या सध्याच्या काळात, लोक खूप वेगवान जीवन जगत आहे, आरोग्य आणि फिटनेसवर लक्ष देणे अनिवार्य बनले आहे. ‘साउंड माईंड, साउंड बॉडी’ हा एसिक्सचा सिद्धांत आणि टायटन ट्रॅव्हलर डिझाईन करण्यामागची टायटनची विचारसरणी एकमेकांना पूरक असल्यामुळे लोकांना त्यांची फिटनेस उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यात सक्षम बनवण्याची बांधिलकी आम्ही दोघांनी स्वीकारली आहे. आधुनिक जीवनशैलीच्या मागण्या पूर्ण करताना सोबत असायलाच हवा असा हा साथीदार ठरेल, याच्या सहयोगाने मानसिक व शारीरिक आरोग्याचे सुयोग्य संतुलन राखण्यात मदत होईल.”
टायटन ट्रॅव्हलर देशभरातील सर्व टायटन वर्ल्ड स्टोर्समध्ये १२,९९५ रुपये किमतीला खरेदी करता येईल. तसेच ऑनलाईन https://www.titan.co.in/ वर ९ नोव्हेंबर २०२३ पासून उपलब्ध होईल.