देवदासी महिलांसमवेत भाऊबीज आणि दिवाळी फराळ
पुणे : शुक्रवार पेठेतील युगंधर कला क्रीडा संघाच्या महिलांनी एकत्र येत देवदासी भगिनींना दिवाळी फराळ आणि भेटवस्तू दिल्या. यावेळी देवदासी महिलांनी उपस्थित सदस्यांसोबत भाऊबीज साजरी केली. संस्थेतील महिलांनी स्वखर्चातून महिलांना दिवाळी फराळ देत दीपावलीचा आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने,अजय खेडेकर, राजेंद्र काकडे, दिलीप परदेशी, विनय दैमीवाळ, बाबासाहेब ढमढेरे, संदेश लिगाडे ,विक्रम भाऊ नाईक, अश्विनी पवार उपस्थित होते. दिवाळीची भाऊबीज भेटवस्तू व फराळ यावेळी उपस्थित महिलांना देण्यात आले.
संस्थेच्या महिला अध्यक्षा रोहिणी नाईक ,पुनम सोंडकर ,कुंदा लव्हणीवाळ, सुनंदा नाईक, नयना बैताडे , पूजा बाबर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सामाजिक कार्यकर्त्या अलका गुंजनाळ यांनी सूत्रसंचालन केले
हेमंत रासने म्हणाले, उदरनिर्वाहासाठी प्रत्येक जण आहे त्या परिस्थितीत काम करत असतो. कुटुंबाचे पोट भरणे हाच हेतू त्यामागे असतो. प्रत्येक देवदासी महिलेला समाजात आदराचे स्थान दिले पाहिजे. यासाठी अनेक उणीवा आहेत, त्या भरून काढायला हव्यात.
बापू नाईक म्हणाले, मागील २० वर्षांपासून युगंधर कला क्रीडा संघाच्या माध्यमातून देवदासी आणि बुधवार पेठेतील महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. दिवाळीनिमित्त या महिलांच्या घरी गोडधोड जावे, या हेतूने त्यांना फराळ आणि भेटवस्तू देण्यात आली