ICC World Cup : रोहित शर्माने रचला नवा विक्रम
मुंबई : वाणखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या ICC World Cup 2023 चा पहिला उंपात्य फेरीचा सामना भारत वि. न्यूझीलंड यांच्यात सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने षटकरांचे अर्धशतक केले. या 50 षटकरांसह रोहितने ख्रिस गेलचा विक्रम मोडला आहे. त्यामुळे वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर झाला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या उपांतफेरीच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या रोहित शर्माने आक्रमक सुरूवात केली. सुरूवातीपासून न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरूवात केली. चौकार आणि षटकरांचा पाऊस पाडत 49 धावा करत रोहित शर्मा बाद झाला. पण आपल्या छोट्या खेळीत रोहितने अनेक विक्रम ध्वस्त केले आहे.
वनडे वर्ल्डकपच्या इतिहासात 50 षटकार मारणारा रोहित शर्मा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याशिवाय एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकाराची नोंदही रोहितच्या नावावर झाली आहे. याआधी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर होता. गेलने 2015 च्या विश्वचषकात 26 षटकार लगावले होते. रोहित शर्माने आज हा विक्रम मोडला आहे. रोहितने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक रुप धारण केले होते.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरोधात झंझावत सुरुवात केली. ट्रेंट बोल्ट आणि साऊदी या आघाडीच्या गोलंदाजांची लाईन लेंथ बिघडवत भारताची धावसंख्या वेगाने वाढवली. रोहित शर्माने वादळी फलंदाजी करता भारताची धावसंख्या वेगाने वाढवली. रोहित शर्माचा हा तिसरा विश्वचषक आहे. 2015 मध्ये रोहित शर्माने विश्वचषकात पदार्पण केले होते. त्यानंतर 2019 विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला होता.