टाटा ऑटोकॉम्प आणि फोर्टाको ग्रुपने सुरु केली आधुनिक केबिन फॅसिलिटी
पुणे : वाहनांचे सुटे भाग बनवणारी आघाडीची कंपनी, टाटा ऑटोकॉम्पने ट्रॅक्टर्स आणि ऑफ हायवे उपकरणांसाठी अत्याधुनिक केबिन्ससाठी उत्पादन सुविधा सुरु केल्याची घोषणा केली आहे. या केबिन्स फोर्टाकोच्या सहयोगाने विकसित केल्या जात आहेत. फोर्टाको ही जागतिक पातळीवरील नामांकित डिझाईन इंजिनीयरिंग व उत्पादन सुविधा पुरवठादार व हेवी ऑफ–हायवे इक्विपमेंटसाठी आघाडीची युरोपियन स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे. ट्रॅक्टर्ससाठी सुरक्षित, प्रगत आणि नाविन्यपूर्ण केबिन सुविधा पुरवून ही नवीन उत्पादन सुविधा शेती उद्योगक्षेत्रात क्रांती घडवून आणेल.
नवीन उत्पादन सुविधेचा उदघाटन समारंभ ७ नोव्हेंबर २०२३ रोजी टाटा ऑटोकॉम्पच्या पुणे, चाकण येथील कम्पोझिट डिव्हिजन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये पार पडला. टाटा ऑटोकॉम्प, फोर्टाकोचे प्रतिनिधी व काही प्रमुख ग्राहक देखील यावेळी उपस्थित होते. ट्रॅक्टर्स व ऑफ हायवेसाठी टाटा ऑटोकॉम्पने सुरु केलेल्या नवीन केबिन फॅसिलिटीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, डिझाईन यांचा समावेश आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आरामदायी, सुरक्षित व एर्गोनॉमिक केबिन्स उपलब्ध होतील. या प्रगत केबिन फॅसिलिटीसाठी फोर्टाको डिझाईन व तंत्रज्ञान पुरवेल.
टाटा ऑटोकॉम्पचे चेअरमन अरविंद गोयल यांनी सांगितले, “आपल्या ग्राहकांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान सादर करण्यात टाटा ऑटोकॉम्प नेहमीच आघाडीवर असते. भारतात ऑफ–हायवे वाहनांची बाजारपेठ वेगाने विकसित होत आहे. युजर्स सुरक्षित व आरामदायी सुविधांची मागणी करत आहेत. फोर्टाकोसोबत डिझाईन व तंत्रज्ञान समन्वयामुळे या नवीन फॅसिलिटीमधून ट्रॅक्टर व ऑफ–हायवे उद्योगक्षेत्राला सुरक्षित व आरामदायी केबिन्स पुरवल्या जातील, त्यामुळे भारत व जगभरातील बाजारपेठांमध्ये आमचे स्थान अधिक मजबूत होईल.”
सेफ्टी केबिन उत्पादन टाटा ऑटोकॉम्प करते, जे फोर्टाकोने पुरवलेल्या तंत्रज्ञान, डिझाईन व स्पेसिफिकेशन्सवर आधारित असते. या भागीदारीमुळे ट्रॅक्टर व ऑफ–हायवे ओईएमना सुरक्षित व विश्वसनीय केबिन्स पुरवल्या जातील. टाटा ऑटोकॉम्प आणि फोर्टाको प्रमुख ट्रॅक्टर व ऑफ–हायवे ओईएमना केबिन्स डिलिव्हर करेल, या केबिन्स देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विकल्या जाणाऱ्या त्यांच्या ट्रॅक्टर्समध्ये बसवल्या जातील.
फोर्टाको ग्रुपचे प्रेसिडेंट आणि सीईओ लार्स हेलबर्ग यांनी सांगितले, “टाटा ऑटोकॉम्पसोबत भागीदारीमुळे आम्हाला आमच्या तांत्रिक क्षमतांचा लाभ घेऊन अशी एक केबिन फॅसिलिटी निर्माण करता आली आहे जी उद्योगक्षेत्रात नवे मापदंड निर्माण करेल. नावीन्य, दर्जा आणि ग्राहकांचे समाधान यावर भर देणाऱ्या या प्रकल्पाचा एक भाग बनणे ही आमच्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे . दोन्ही टीम्समधील समन्वय अतिशय फलदायी ठरला आहे. आम्हाला पक्की खात्री आहे की, या केबिन्सनी सुसज्ज ट्रॅक्टर्स शेती समुदायामध्ये सकारात्मक प्रभाव घडवून आणतील.”
नवी केबिन फॅसिलिटी टाटा ऑटोकॉम्प व फोर्टाको यांच्या शेती क्षेत्राच्या कार्य व उत्पादन क्षमतांमध्ये वृद्धी घडवून आणण्याच्या मिशनला अनुरूप आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान व डिझाईन यांचा समावेश करून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे व शेती उद्योगक्षेत्राच्या एकंदरीत वृद्धीमध्ये योगदान देण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.