सनी घेऊन येते ” थर्ड पार्टी ”
सनी लिओनी नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी साठी चर्चेत असते आणि ती पुन्हा एकदा आणखी एका चार्टबस्टरसह मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. “केनेडी” च्या अभूतपूर्व यशानंतर आता ती एका नव्या प्रोजेक्ट मध्ये दिसणार आहे. केनेडी स्टारने सोशल मीडियावर तिच्या या चित्रपटाची उत्कंठा वाढवली आहे. सनी लवकरच तिच्या नवीन पार्टी साँग मध्ये दिसणार असून ‘थर्ड पार्टी’ अस या गाण्याचं नाव आहे.
१५ नोव्हेंबरला आम्ही आवाज वाढवत आहोत आणि #ThirdParty सोबत डान्स फ्लोअर गाठत आहोत! रात्रीच्या लयीत जाण्यासाठी सज्ज व्हा.
सनी चे आगामी प्रोजेक्ट तितकेच कमालीचे असून संगीत जगतात तिने एक अजून नवीन पाऊल ठेवलं आहे. अभिषेक सिंगचे प्रतिभावान गायन आणि अपवादात्मक आदिल शेख यांचे डायनॅमिक कोरिओग्राफी असलेले ” थर्ड पार्टी ” हे गाणं असणार आहे.
अनुराग कश्यपच्या निओ-नॉयर थ्रिलर “केनेडी” मधील चार्लीच्या भूमिकेसाठी जागतिक स्तरावर प्रशंसा मिळवत आहे. सनी लिओनी प्रेक्षकांना मोहित करत आहे. तिच्या वाढत्या प्रशंसा दरम्यान ती ‘कोटेशन गँग’ मध्ये तिच्या तमिळ पदार्पणाची सगळेच वाट बघतात. जिथे ती जॅकी श्रॉफ, प्रियामणी आणि सारा अर्जुन यांच्यासोबत महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.