fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNE

मावळातील गोशाळेस वसुबारसेनिमित्त पाच हजार किलो ऊस प्रदान

पुणे : पुण्यातील चार गणेश मंडळांनी वसुबारसेनिमित्त आज (दि. 9) मावळातील आर्डव गावातील श्री महावीर गोपालकृष्ण गोशाळेतील 27 गायी व वासरांसाठी पाच हजार किला हिरवा ताजा उस, चारा देऊन गायींचे औक्षण आणि पूजन केले.

श्री महावीर गोपालकृष्ण गोशाळा अतिशय दुर्गम भागात आहे. कसायांच्या तावडीतून सोडवून आलेल्या गायी व वासरांचे येथे संगोपन केले जाते. सुनील महाराज वरघडे ह्यांची ही गोशाळा आहे. गणेशोत्सवाबरोबच समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात पुढाकार असलेल्या गणेश मंडळांनी वसुबारसेनिमित्त आज हा उपक्रम घेतला. मंडळांनी गोशाळेस चारा देण्याबरोबच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या प्रसंगी गोसेवाही केली.

बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पीयुष शाह, वीर शिवराज मित्र मंडळाचे किरण सोनिवाल, फडके हौद येथील विधायक मित्र मंडळाचे अभिषेक मारणे व नवी पेठेतील अष्टविनायक मित्र मंडळाचे अध्यक्ष हर्षद नवले यांनी या उपक्रमाचे संयुक्तीरित्या आयोजन केले होते.

Leave a Reply

%d