fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNE

विशेष मुलांच्या चेहऱ्यावर उजळला दिवाळीचा आनंद

पुणे : शुभ दिपावाली असा संदेश देणारी शाळेच्या प्रांगणात रेखाटलेली सुंदर रांगोळी, प्रकाशमन झालेले दिवे अन्‌‍ आकाश कंदील, चविष्ट फराळाबरोबरच बहारदार लावणी नृत्याचे सादरीकरण असा अनोखा कार्यक्रम रंगला तो सोमवार पेठेतील जीवनधारा ह्या विशेष मुलांच्या शाळेत..!
निमित्त होते ते सोमवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट आणि अखिल रामनगर मित्र मंडळ, येरवडा यांच्या संयुक्त विद्यामाने दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे. दोन्ही मंडळांच्या वतीने जीवनधारा विद्यालयातील 70 विशेष मुलांना आकाश कंदील व दिवाळी फराळ भेट देण्यात आला.
सुरुवातीस लावणी व लोकगीतांच्या तालावर मुलांनी ठेका धरत नृत्य सादर केले. त्यानंतर फराळाचा आस्वाद घेत फटाक्यांची आतषबाजी करत दिवाळीचा आनंद लुटला. मंडळाच्या या अनोख्या उपक्रमामुळे मुलांचे चेहरे आनंदाने अधिकच उजळून गेले तर शाळेमध्ये चैतन्यदायी वातावरणाची निर्मिती झाली.
तिमिराकडून तेजाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. समाजातील तळागळातील मुलांपर्यंत दिवाळीचा प्रकाश पोहोचावा, त्यांनाही दिवाळीचा आनंद मिळावा या उद्देशाने गेल्या तीन वर्षांपासून साईनाथ मंडळ ट्रस्ट व अखिल रामनगर मित्र मंडळ हा उपक्रम राबवित आहे. वंचित मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे म्हणजे खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करणे होय, असे मनोगत पीयुष शाह यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन साईनाथ मंडळ ट्रस्टचे पीयुष शाह व येरवडा येथील अखिल रामनगर मित्र मंडळाचे राकेश चव्हाण यांच्यावतीने करण्यात आले होते. फरिदा पारेख, अर्चना कलशेट्टी, सुषमा पोटे, गंधाली शाह, प्रल्हाद थोरात, सुनील राठोड, राजेश चव्हाण, अमित विसखंदे, अभिषेक मारणे, नरेंद्र व्यास उपस्थित होते. मुख्यध्यापिका करुणा गायकवाड, मंजुषा चीनके, सेवा चव्हाण, रावसाहेब झावरे या शिक्षकांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

%d