पुण्यातील गणेश मंडळांनी केली रायरेश्वरच्या पायथ्याशी , गोरगरीब कातकरी, आदिवासी बांधवासोबत दिवाळी साजरी
पुणे : भोर तालुक्यातील डोंगराळ भागात राहणाऱ्या गोरगरीब कष्टकरी कातकरी, आदिवासी वस्तीवरील कुटुंबांसोबत दिवाळी साजरा करण्याचा अभिनव विधायक उपक्रम पुण्यातील गणेश मंडळांनी राबविला. सलग 11 वर्षे हा उपक्रम मंडळे राबवित आहेत बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट , येरवडा येथील नवज्योत मित्र मंडळ, गुरुवार पेठ येथील वीर शिवराज मंडळ व सिंहगड रोड येथील युगंधर मित्र मंडळा च्या पदाधिकाऱ्यांनी रायरेश्वरच्या पायथ्याशी असणार्या टिटेघर- माकोशी-अंबवडे- शिरवली- नाटंबी येथील कातकरी, आदिवासी वस्ती वरील 85 कुटुंबांना लाडू , चिवडा , फरसाण, करंजी, चकली, शंकर पाळी, या दिवाळीच्या फराळा सह आकाश दिवे, पणत्या, फटाके व कपडे भेट दिली. दिवाळीचा आनंद त्या वंचितांना देखील साजरा करता यावा म्हणून पुण्यातील गणेश मंडळांनी हा अभिनव उपक्रम राबविला. व विद्यार्थ्यांना सैक्षणिक साहित्य देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
दिवाळी ची अशी भेट पाहून सर्वांचे चेहरे आनंदाने उजळेले होते, दारात आकाश कंदील लावत त्यांची दिवाळी प्रकाशमय केली … .
यावेळी साईनाथ मंडळाचे पीयूष शहा,नंदू ओव्हाळ, नवज्योत मंडळाचे अमित जाधव, सार्थक जाधव, शिवराज मंडळाचे अध्यक्ष किरण सोनवाल, मोहित झांजले, चैतन्य सिन्नरकर, व युगंधर मंडळाचे मयूर पोटे, राज निलवर्ण , तिथेघर चे विकास पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पुण्यातील गणेश मंडळांनी अचानक दिवाळीनिमित्त दिलेल्या या आनंददायी भेटीमुळे चेहर्यावरील आनंद ओसंडून वाहत होता….