Wednesday, June 10, 2026
BusinessLatest News

एल अॅण्ड टी फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेड (एलटीएफएच) च्या  किरकोळ कर्जवितरणाचा पोर्टफोलिओ 30 सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत 88 टक्क्यांवर

अग्रगण्य नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) असलेल्या एल अॅण्ड टी फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेडच्या (एलटीएफएच) किरकोळ कर्जवितरणाचा (रिटेललायझेशन) पोर्टफोलिओ शेअर बाजाराला सादर केलेल्या माहितीत 30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत 88 टक्के असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत तो 58 टक्के होता . कंपनीने आखलेल्या लक्ष्य 2026 योजनेमध्ये  80 टक्के रिटेल कर्जवितरणाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलेले होते. त्यापेक्षा अधिक उद्दीष्ट गाठत कंपनीने कामगिरीत मोठी झेप घेतली आहे.

 

कंपनीने 30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत 13 हजार 490 कोटी रुपयांचे किरकोळ कर्जवितरण केलेले असून वार्षिक तिमाहीच्या तुलनेत त्यात 32 टक्के वाढ झालेली आहे.

किरकोळ कर्जवितरणाची 30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी ठळक माहिती पुढीलप्रमाणे आहेतः

  • कृषी क्षेत्रासाठी कर्ज वितरण अंदाजे 1,530 कोटी रुपये. त्या तुलनेत एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 1,304 कोटी रुपयांची नोंद झाली होती
  • ग्रामीण भागातील व्यवसायासाठी कर्ज वितरण अंदाजे 5,740  कोटी रुपयांच्या तुलनेत  एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 4,418 कोटी रुपयांची नोंद झाली होती
  • शहरी भागातील कर्ज वितरण अंदाजे 4,860 कोटी रुपयांच्या तुलनेत मागील वर्षी याच तिमाहीत 4,166 कोटी रुपयांची नोंद झाली होती
  • एसएमई क्षेत्रासाठी कर्ज वितरण अंदाजे 870 कोटी रुपयांच्या तुलनेत वर्षभरापूर्वी याच तिमाहीत 201 कोटी रुपयांची नोंद झाली होती

30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीअखेरीस किरकोळ (रिटेल) कर्जाची एकूण रक्कम अंदाजे 69 हजार 400 कोटी रुपये असून वार्षिक आधारावर त्यात सुमारे 33 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading