Tuesday, September 1, 2026
BusinessLatest NewsLIFESTYLE

तनाएराने सणासुदीच्या निमित्ताने सादर केले द क्वीन्स कलेक्शन

टाटा समूहातील एक सदस्य ब्रँड, तनाएराने यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सादर केले आहे आपले फेस्टिव्ह एडिट – द क्वीन्स कलेक्शन. प्युअर सिल्कच्या विविधतेने समृद्ध, कुशल हातांनी तयार केलेल्या, डिझायनर साड्या लॉन्च करण्यासाठी तनाएरा ब्रँडने अभिनेत्री मृणाल ठाकूरचा सहभाग असलेली एक टीव्हीसी प्रस्तुत केली आहे.

अतिशय लोभस व्यक्तिमत्त्व असलेली मृणाल ठाकूर मोहक गिरक्या घेत, नृत्य करत जेव्हा क्वीन्स कलेक्शन प्रस्तुत करते तेव्हा संपूर्ण स्क्रीन उत्सवाच्या आनंदाने भारून जाते.  आधुनिक महिलेच्या उत्साहाचा सन्मान या कलेक्शनमध्ये करण्यात आला आहे, आजच्या काळातील महिला जी स्वतःची कथा स्वतः रचते, स्वतःचा प्रवास स्वतः आखते आणि स्वतःची अद्वितीय कहाणी लिहिते.

संपूर्ण देशभरातील विविध भागांमधील ग्राहकांशी सहज संवाद साधता येईल अशा भाषेमध्ये तयार करण्यात आलेल्या तनाएराच्या कॅम्पेनमध्ये आपण एका अशा महिलेला भेटतो जी परिपूर्ण आनंद अनुभवते, अस्सल ‘स्व’त्व स्वीकारते आणि साडीची शोभा वृद्धिंगत करणारी राणी बनण्याची आंतरिक इच्छा प्रकट करते. तिची साडी केवळ साडी नाही तर त्या महिलेचे व्यक्तिमत्व अभिव्यक्त करणारा कॅनवास बनून आपल्या समोर येते. आधीच्या सणांच्या आठवणी असोत किंवा कौटुंबिक परंपरा, साड्या त्या प्रत्येक क्षणाला जिवंत करतात, काळ आणि शैली यांच्यातील अंतर दूर करतात व मौल्यवान आठवणी जतन करण्याचे साधन बनतात.

जल, वायु, आकाश, पृथ्वी आणि अग्नी या पाच मूलभूत शक्तींनी प्रेरित होऊन तयार करण्यात आलेले द क्वीन्स कलेक्शन, तनाएराची नाविन्यपूर्ण डिझाइन्स आणि वैविध्यता जपण्याप्रती दृढ वचनबद्धतेचे उत्तम उदाहरण आहे. स्वत्व जपण्याची क्षमता आणि स्वतःचे सर्व पैलू स्वीकारण्याचे अष्टपैलुत्व प्रदान करणारे हे कलेक्शन आजच्या काळातील आत्मविश्वासू महिलेसाठी तयार करण्यात आले आहे. या कलेक्शनमधील प्रत्येक साडी महिलेचे सामर्थ्य आणि स्वातंत्र्य दर्शवते, प्रत्येक पट आपल्या आयुष्याचा अंकुश आपल्या हातात ठेवण्याची, आपल्या आयुष्याची राणी बनण्याची महिलेची क्षमता दर्शवतो.

तनाएराच्या जनरल मॅनेजर शालिनी गुप्ता यांनी कॅम्पेनविषयी सांगितले, “द क्वीन्स कलेक्शनसाठी मृणाल ठाकूरसोबत सहयोग करून आम्ही आजच्या काळातील महिलेचा उत्सव साजरा करत आहोत. ज्याप्रमाणे साडी केवळ एक कापड म्हणून मर्यादित न राहता शैली, संवेदनशीलता आणि स्व-अभिव्यक्ती दर्शवते त्याचप्रमाणे आजच्या काळातील महिला आपली अभिरुची व कृतींमधून स्वतःला व्यक्त करते. जेव्हा एखादी आधुनिक महिला तनाएरा साडी परिधान करते तेव्हा जादू होते. आपण राणी असल्याची भावना तिच्या आतून जागृत होते, तिच्या प्रत्येक पावलामध्ये नैसर्गिक आत्मविश्वास दिसून येऊ लागतो

अभिनेत्री मृणाल ठाकूर म्हणाल्या, “साडी आणि आपल्या देशातील कला संस्कृतीचे मनापासून कौतुक असलेली व जेव्हा-जेव्हा संधी मिळेल तेव्हा साडी नेसणे आवडणारी व्यक्ती म्हणून मला तनाएरासोबत सहयोग करताना खूप आनंद झाला. द क्वीन्स कलेक्शनची शान आणि मोहकता आधुनिक महिलांचे सार दर्शवते, त्यांचा आत्मविश्वास, अनोखी शैली व आंतरिक सामर्थ्य यामधून दर्शवले जाते.”

ऑगिल्वी, साऊथचे चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर,  पुनीत कपूर म्हणाले, प्रभावी फॅशन कम्युनिकेशनमध्ये तुमच्या कल्पना सुबकपणे आणि साधेपणाने पोहोचवण्याचा एक मार्ग आहे, तिथे कमी म्हणजे जास्त आहे आणि तुम्हाला काय वाटते ते बोलल्या गेलेल्या शब्दापेक्षा खूप महत्त्वाचे आहे. सण आणि साड्यांमध्ये आधुनिक काळातील स्त्रीभोवती शाश्वततेची भावना विणण्याची विलक्षण शक्ती आहे. आमचे हे कॅम्पेन ती शानदार भावना जागृत करण्याचा प्रयत्न करते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading