19 वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट महिला संघात अदिती वाघमारेची निवड
पुणे:अतिशय हलाखीच्या परिस्थितीवर मात करून वाॅरिअर्स क्रिकेट अकॅडमीची खेळाडू अदिती वाघमारेची महाराष्ट्राच्या एकोणीस वर्षाखालील महीलांच्या क्रिकेट संघात निवड झाली.
गेली ३ वर्ष पुणे येथील वाॅरिअर्स क्रिकेट क्लब मध्ये सराव करीत असून स्वप्नील मोडक यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. मागील वर्षी यशाने हुलकावणी दिली असताना हताश न होता या वर्षी अतोनात मेहनत करून तीने हे यश संपादन केले. महाराष्ट्र महिला संघात निवड झाल्यानंतर याचे सर्व श्रेय तिने आईवडिलांना व कोच स्वप्नील मोडक यांना दिले भारतीय महिला टीम व आय .पी .एलमध्ये खेळणे यासाठी मोठ्या प्रमाणात सराव करणार असल्याचे अदिती वाघमारे हिने व्यक्त केली.
