बहारदार गीतांच्या कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध
पुणे : मराठी बरोबर हिंदीतील दर्जेदार गीते सादर करत पुणेकर संगीतप्रेमींची मने जिंकण्यात आली निम्मित होतं आशिकी ऑफ बॉलिवूड या कार्यक्रमाचं डॉ. झोहर चूनावाला व हिम्मतकुमार पंड्या यांनी गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला संगीत प्रेमींनी उदंड प्रतिसाद दिला. याच बरोबर आशिकी, वास्तव फेम अभिनेता दिपक तिजोरी व कॉमेडी किंग ऑफ बॉलिवूड ज्युनिअर मेहमूद हे आवर्जून उपस्थित होते.
पुणे रोटरी क्लबच्या पोलिओ रोग निर्मूलनसाठी या मैफलीचे आयोजन केले होते. या संगीत मैफिलीत गल्यात साखली सोन्याची, हील पोरी हिला अशा अनेक मराठी तर हिंदीतील सांसो की जरुरत है जैसे, ऐसी दिवानगी, सात समंदर, मैं दुनिया भुला दुंगा , जब कोई बात बिगड जाये, धक धक करने लगा, चांदनी ओ मेरी चांदनी यांसारखी एकापेक्षा एक बहारदार गाणी सादर करण्यात आली. गायक अनिता शर्मा, हिम्मतकुमार पंड्या, रश्मी मुखर्जी, आकाश सोलंकी यांनी आपल्या आवाजाची मोहिनी रसिकांच्या मनावर घातली. त्यांना १० लाईव्ह मुझिशियन्स यांनी भक्कम साथ दिली.
रोटरी क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्षा मंजू फडके, प्रसाद केरकर, ए जी मुकेशी, आयोजक डॉ. झोहर चूनावाला, गायक हिम्मतकुमार पंड्या या प्रसंगी उपस्थित होते. या मैफिलीचे निवेदन आर जे बंड्या सहनिवेदन निराली मांकड यांनी केले.
