जावा येझदी मोटरसायकल्सने जावा ४२ आणि येझदी रोडस्टरचे नवे प्रीमियम अवतार सादर केले: किमती १.९८ लाख आणि २.०८ लाख रुपये
पुणे : मान्सून परतीच्या प्रवासाला निघालाय, सणसमारंभांची लगबग सुरु झाली आहे आणि आम्ही रायडींग सीझनसाठी पुन्हा एकदा सज्ज झालो आहोत. पुढचे काही महिने रायडिंगसाठी सुगीचा काळ असणार आहेत. या निमित्ताने जावा येझदी मोटरसायकल्समध्ये आम्ही अतिशय अभिमानाने सादर करत आहोत आमच्या अतिशय आवडीच्या दोन मोटरसायकल्स जावा ४२ आणि येझदी रोडस्टरमध्ये प्रीमियम ऍडिशन्स. क्लासिक डिझाईन, अत्याधुनिक कामगिरी, अस्सल निओरेट्रो एस्थेटिक्स यांचा उत्तम मिलाप या मशिन्समध्ये घडवून आणला आहे. जावा येझदी मोटरसायकल्स ब्रँडने नेहमीच टप्प्याटप्प्याने आणि सातत्यपूर्ण उत्क्रांती केली आहे. आमच्या मोटरसायकल्समधून हे पुरेपूर दिसून येते. जागतिक दर्जाची उत्पादने, अतुलनीय दर्जा प्रदान करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. आमची सर्व उत्पादने जागतिक बाजारपेठेसाठी भारतात बनवली जातात. नव्याने लॉन्च करण्यात आलेली जावा ४२ ड्युएल टोन आणि येझदी रोडस्टर व्हेरियंट्स नवे मापदंड रचत आहेत.
दोन्ही प्रीमियम व्हेरियंट्स चार नव्या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असून त्यामध्ये अनेक प्रगत वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे रायडर्सना अतुलनीय अनुभव नक्की घेता येईल. नवीन जावा ४२ ड्युएल टोनच्या किमती १,९८,१४२ रुपयांपासून पुढे तर नवीन येझदी रोडस्टरच्या किमती २,०८,८२९ रुपयांपासून पुढे आहेत. आधीच्या जावा ४२ आणि येझदी रोडस्टर मॉडेल्सबरोबरीने हे नवीन व्हेरियंट्स डीलरशिप्समध्ये उपलब्ध आहेत. आता जावा ४२ श्रेणीच्या किमती १,८९,१४२ रुपयांपासून तर येझदी रोडस्टरच्या किमती २,०६,१४२ रुपयांपासून पुढे आहेत. (सर्व किमती एक्स-शोरूम दिल्ली)
नवीन जावा ४२ ड्युअल टोन हे जावा ४२ चे पुनर्कल्पित रूप आहे. क्लियर टोन इंडिकेटर्स, शॉर्टहँग फेन्डर्स आणि नवीन डिम्पल्ड फ्युएल टॅन्क ही ड्युएल टोन व्हेरियंटची वैशिष्ट्ये असून त्यासोबत प्रीमियम डायमंड कट अलॉय व्हील्स देखील देण्यात आले आहेत. याशिवाय इंजिन आणि एक्झॉस्ट कम्पोनंट्सना रावेन टेक्श्चर फिनिश देऊन प्रीमियम ड्युएल टोन कलरवेजचा कॉन्ट्रास्ट वाढवण्यात आला आहे, यामध्ये कॉस्मिक रॉक, इन्फिनिटी ब्लॅक, स्टारशिप ब्ल्यू आणि सेलेस्टीयल कॉपर यांचा समावेश आहे. नवीन जास्त स्पोर्टी एस्थेटिक्सना साजेशी असावी यासाठी सीट देखील रीडिझाईन करण्यात आली आहे.
नवीन व्हेरियंटमध्ये रीडिझाईन केलेले बॅश प्लेट, नवीन हॅन्डलबार माउंटेड मिरर आणि नवीन हॅन्डलबार ग्रिप्स आहेत. सर्व जावा ४२ मध्ये २९४.७ सीसी लिक्विड-कूल्ड सिंगलसिलिंडर इंजिन आहे जे २७.३ पीएस आणि २६.८ एनएम देते. फक्त ५७५० आरपीएमला पीक टॉर्क उपलब्ध असलेली ४२ ही एक आदर्श सिटी बाईक आहे जी हायवेवर देखील दमदार कामगिरी बजावते. स्मूद सिक्स-स्पीड गियरबॉक्स आणि श्रेणीतील अव्वल ड्युएल-चॅनेल एबीएस असल्याने सुरक्षिततेची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे.
जावा येझदी मोटरसायकल्सचे सीईओ आशिष सिंग जोशी यांनी सांगितले, “जावा येझदी मोटरसायकल्समध्ये आमची कहाणी मोटरसायकल्सपुरती मर्यादित नाही, ही कहाणी आहे पॅशनची, नावीन्य आणि पिढ्यापिढ्यांपर्यंत ज्यांची प्रसिद्धी टिकून राहील अशा मशिन्स बनवण्याच्या अतूट निष्ठेची. आम्ही अशा मोटरसायकल्स बनवण्यासाठी प्रयत्नशील आहोत ज्यांचे फक्त कौतुक केले जात नाही तर त्या जतन केल्या जातात, ज्यांच्याविषयी मनापासून आवड असते. नवीन जावा ४२ आणि येझदी रोडस्टर उत्कृष्टतेप्रती आमची बांधिलकी आणि ग्राहकांच्या प्रतिक्रिया, प्रतिसाद यावर गांभीर्याने विचार करण्याचे आमचे धोरण दर्शवतात. या मोटरसायकल्स म्हणजे आम्ही रायडर्सना दिलेले वचन आहे की ते एका चिरकाल टिकून राहील अशा सुंदर गोष्टीचा एक भाग आहेत.”
येझदी रोडस्टर: नवीन येझदी रोडस्टरमध्ये एर्गोनॉमिक्समध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आल्यामुळे ही मोटरसायकल आता अधिक जास्त टूरिंग-फ्रेन्डली बनली आहे. सर्वात प्रमुख बदलांमध्ये रिवाईज्ड रायडर फूट पेग्स (१५५ एमएमने फॉरवर्ड सेट) आणि अधिक उंच हॅन्डलबार यांचा समावेश आहे. या सुधारणा ब्रॅन्डचा ग्राहकांच्या प्रतिसादांप्रती सक्रिय दृष्टिकोन दर्शवतात. हे नवे व्हेरियंट आधीच्या रोडस्टरसोबत विक्रीला असणार आहे त्यामुळे ग्राहकांकडे त्यांच्या गरजा आणि आवडीनिवडींना पुरेपूर वाव देता येणार आहे.
नवीन जावा ४२ प्रमाणे, येझदी रोडस्टरमध्ये देखील महत्त्वपूर्ण डिझाईन सुधारणा करण्यात आल्या आहेत, स्पोर्टीयर दिसणारे नी रिसेस, प्रीमियम डायमंड-कट अलॉय व्हील्स, इंजिन आणि एक्झॉस्टवर रावेन टेक्श्चर फिनिश यांचा त्यामध्ये समावेश आहे. नवीन हॅन्डलबार ग्रिप्स आणि हॅन्डलबार-माउंटेड मिरर या सुधारणा ग्राहकांच्या प्रतिसादांना अनुसरून करण्यात आल्या आहेत.
नवीन एक्झॉस्ट्स ही आणखी एक महत्त्वाची ऍडिशन आहे. आधीच्या येझदीज् ना आश्चर्याचा धक्का ठरेल असे नवे कर्व्ह्ड राऊटिंग असो किंवा नवे रर्टी एक्झॉस्ट नोट असो, रोडस्टर गांभीर्याने मजा घेऊ शकतील. या नवीन मॉडेलमध्ये चार नवे रंग आहेत ज्यामध्ये रश अवर रेड, फॉरेस्ट ग्रीन आणि ल्यूनार व्हाईट या तीन ड्युएल टोन थीम्सचा व शॅडो ग्रे या सॉलिड थीमचा समावेश आहे.
येझदी रोडस्टरमध्ये स्पिरिटेड ३३४सीसी लिक्विड-कूल्ड सिंगल सिलिंडर इंजिन आहे जे २९.५ पीएस आणि २८.९ एनएम देते. श्रेणीतील आघाडीचे ड्युएल-चॅनेल एबीएस असून हायवेवर सुरळीतपणे ड्राइव्ह करता यावे यासाठी १४४० एमएमचा रुंद व्हीलबेस देण्यात आला आहे.
नवीन जावा ४२ ड्युएल टोन आणि येझदी रोडस्टर या दोन्ही अशा मोटरसायकल्स आहेत ज्या भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळातील अंतर सहजपणे मिटवतात. आपला समृद्ध वारसा पुढे चालवताना उत्कृष्टता प्रदान करण्याची ब्रॅन्डची वचनबद्धता यामधून दिसून येते. जावा आणि येझदी या दोन्ही मोटरसायकल्सच्या चाहत्यांची हृदये जिंकण्यासाठी ही नवी व्हेरियंट्स तयार करण्यात आली आहेत. त्याबरोबरीनेच रायडर्सच्या नव्या पिढीला आकर्षित करण्यासाठी यामध्ये क्लासिक डिझाईन व आधुनिक वैशिष्ट्यांचा समन्वय साधला गेला आहे.
