Tuesday, May 5, 2026
Latest NewsPUNE

“स्वररंग २०२३ विभागीय युवक महोत्सव” मध्ये सलग दुसऱ्यांदा सरहद महाविद्यालयास सर्वसाधारण विजेतेपद

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ आयोजित “स्वररंग २०२३ विभागीय युवक महोत्सव” दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ रोजी टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खडकी मध्ये सरहद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने  सलग दुसऱ्यांदा घवघवीत यश मिळवून सर्वसाधारण विजेतेपदाचा  मान  पटकाविला.
स्वररंग विभागीय युवक महोत्सवात संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य आणि ललित कला अशा एकूण पाच प्रमुख कला प्रकारांचा समावेश होता. यातील १४ उपप्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी विजेतेपद पटकाविले.
महाविद्यालयातील ४९ युवक-युवती कलावंतांनी २३ उपप्रकारांमध्ये उस्फूर्त सहभाग नोंदविला व उत्तुंग यश मिळविले.
सरहद संस्थेचे अध्यक्ष मा. संजय नहार, सचिव मा . सुषमा नहार, विश्वस्त मा. शैलेश वाडेकर व अनुज नहार,  प्राचार्य डॉ. हनुमंत जाधवर व उपप्राचार्या डॉ संगीता शिंदे यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
डॉ. हनुमंत जाधवर, उपप्राचार्या डॉ संगीता शिंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पल्लवी पाटील व डॉ. स्वप्ना थोरगुले यांचे बहुमूल्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading