Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

राजीव गांधी स्मारक समिती’ तर्फे, ‘मला समजलेले महात्मा गांधी’ विषयावर विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा..! व ‘मोदी सरकार’ विरोधी जनमत जाणून घेण्यासाठी ‘मिस कॉल’ अभियान


– काँग्रेसनेते गोपाळदादा तिवारी यांची माहिती
पुणे :  राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती (२आक्टों) आली की अलीकडच्या काळात प्रत्येकाच्या मोबाईलवर महात्मा गांधी विषयी “केवळ स्वच्छतेच्या अनुषंगाने” संदेश फिरतात. पण त्याही पुढे जावून महात्मा गांधी काय होते व त्यांची खरी शिकवण काय आहे…(?) तसेच “स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान, अहिंसेची शिकवणुक, हरिजन सेवा, स्वराज्या बाबत निग्रही, सतत सत्याची कास धरणारे, मानवी मुल्यांची व लेकशाही जोपासना करणारे, स्त्री-पुरुष समानते विषयी आग्रही, असे अनेक पैलू ऊद्याचे देशाचे नागरिक व आजचे उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी समजून घ्यावेत या उद्देशाने ‘राजीव गांधी स्मारक’ समितीच्या वतीने “मला समजलेले महात्मा गांधी” या विषयावर माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांसाठी “निबंध स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. येत्या २ ऑक्टोबर २०२३ ते ३० जानेवारी २०२४ दरम्यान ही निबंधस्पर्धा घेतली जाणार आहे, अशी माहिती कॉँग्रेसचे राज्य प्रवक्ते  व राजीव गांधी स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष गोपाळदादा तिवारी यांनी आज ‘पत्रकार परिषदेत’ दिली. 

गोपाळदादा तिवारी म्हणाले, भाजपा सरकार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना एकीकडे हरघर तिरंगा मोहीम राबावते, तर दुसरीकडे तिरंग्याचा व स्वातंत्र्य दिनाचा घोर अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंना पाठीशी घालते. सरकार कडून समाजात धार्मिक व जातीय तेढ निर्माण जात आहे. अशा परिस्थितीत कॉँग्रेस पक्ष आणि राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने सामाजिक जनजागृतीपर अनेक उपक्रम घेतले जात आहे.
मोदी सरकार व राज्यातील भाजपचेच त्रिकुट सरकार व त्यांची असंवैधानिक कृत्ये, जबाबदारी पासुन पळ काढणे, राजधर्मास तिलांजली देणे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत त्यांना देशेधडीला लावणे, काँट्रॅक्ट फार्मिंग’च्या चक्रव्ह्युहात बळीराजास अडकवण्सासाठीच त्यांस बेजार करणे, शासकीय पदें संविधानीक पध्दतीने न भरता.. कंत्राटी पध्दतीने भरणे, सरकारी शाळा खाजगी कार्पोरेटना देण्याच्या वल्गना करणे, प्रचंड महागाईवर, कर कमी करणेबाबत व जनतेस दिलासा देण्याचे कोणतेही कृत्य न करता, देश व राज्यास कर्जाच्या खाईत ढकलणे व संविधानीक व अनैतिक पध्दतीने सरकारे पाडणे या सर्व सत्ताधाऱ्यांच्या “असंविधानिक कृत्यांबद्दल” जनतेला काय वाटते…(?) व या उपक्रमांना जनतेचा पाठिंबा मिळावा.. सरकार विरोधी आंदोलनात जनतेचा ही सहभाग व्हावा या हेतुनेच, राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने एक ‘मिस कॉल’ द्या व सरकार विरोधी आंदोलनास पाठींबा द्या अशाप्रकारचे आंदोलन, गांधी जयंती (२ ऑक्टोबर २३) पासून सुरू करत आहोत.  9649303039 या क्रमांकावर मिस कॉल देऊन नागरिकांनी सरकार विरोधी भावना प्रकट करण्यासाठी व “स्वातंत्र्य टिकवण्यासाठीच्या” जन-आंदोलनात, आपला पाठिंबा नोंदवावा, असे आवाहन गोपाळदादा तिवारी यांनी केले.   

ते पुढे म्हणाले की, मोदी सरकारचे ‘निवडणुक आयोगावरील दबावामुळेच’ पुणेकर आपला प्रतिनिधी संसदेत पाठवण्यास मुकले आहेत. हे कृत्य निंदनीय व असंवैधानिक आहे..! देशात ‘संसद_सदस्यांच्या रिक्त पदांवर’ पोट निवडणुका झाल्या, मात्र ‘ऐतिहासीक नगरी व देशाला दिशा देणाऱ्या क्रांतीकारकांचे शहर म्हणुन ओळख लाभलेल्या’ पुणे लोकसभा मतदार संघातील’ निवडणुक (सु १८ महीन्यांचा कालावधी असुन देखील) पध्दतशीर टाळुन, नव्या-संसदेत ‘पुणेकरांना आपला प्रतिनिधी’ पाठवण्या पासून व त्यासोगे विकासा पासुन वंचित ठेवण्याचे पाप देखील भाजप ने केल्याचा आरोप गोपाळदादा तिवारी यांनी केला. पोट निवडणुकीतुन, पुणे शहरातुन, काँग्रेस खासदार संसदेत गेला असता.. मात्र ही चाहुल लागल्याने भाजपने दबावाचे राजकारण करून, “पुणे लोकसभा पोट निवडणुक” होऊ दिली नसल्याचा आरोप ही त्यांनी केला..! गेले सु१॥ वर्षे मनपा देखील बरखास्त असुन, संसदेत पुण्याचा खासदार नाही, ही बाब पुणेकरांना वाऱ्यावर सोडणारी असल्याचे ते म्हणाले..!
पत्रकारांच्या विविध प्रश्नास उत्तर देतांना ते पुढे म्हणाले की, नव्या संसदेचे विशेष अधिवेशन म्हणजे भाजप सरकारचा श्रेयजीवी स्टंट होता. महिला आरक्षणाचे विधेयक या अधिवेशनात मांडण्यात आले. एकीकडे हे सरकार महिलांचे कैवारी असल्याचे सांगत पुढे येतात. तर दुसरीकडे आदिवासी समाजाच्या महिला राष्ट्रपतींना नवीन संसद भावनांच्या उदघाटनासाठी देखील न बोलावता त्यांच्या अवमान करते. ही भाजपची दूटप्पी निती आहे, अशी टीका देखील गोपाळदादा तिवारी यांनी केली.
या प्रसंगी माजी नगरसेवक जयसिंह भोसले, भोला वांजळे, ॲड संतोष जाधव, ध्वनी-पुस्तकवाणी ॲाडीयो बुकच्या संचालिका रश्मी नायगांवकर, ॲड सचिन अडसुळ, आबा जगताप, ॲड स्वप्नील जगताप, योगीराज नाईक, विकास दवे, श्रावण भोकरे, पै शंकर शिर्के, गणेश शिंदे, विनायक पाटील, श्रीनाथ बरीदे, नरेश आवटे, प्रसिध्दी सहाय्यक उदय लेले इ उपस्थित होते. भोला वांजळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading