उद्यापासून PMP बस मध्ये तिकिटासाठी कॅशलेस पेमेंट सुविधा
उद्या दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी पासुन सुरुवात.
कोथरूड आगारात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते शुभारंभ.
प्रवाशांना तिकिटासाठी क्यू-आर कोडद्वारे पेमेंट करता येणार.
वाहकाच्या ई – तिकीट मशीनमध्ये तिकीट रक्कमेचा क्यू-आर कोड स्कॅन करून युपीआय द्वारे पेमेंट करता येणार.
कॅशलेस पेमेंट सुविधेमुळे ज्या जुन्या सुविधा चालू आहेत त्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
महामंडळामध्ये २०१५ पासुन ई – तिकीट मशीन मधून तिकीट प्रणाली सुरु करण्यात आलेली होती. परंतु डिजिटल पेमेंट सुविधा प्रवाशांकरिता सुरु करणे प्रलंबित होते. प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार दि. ०३/०९/२०२३ रोजी महामंडळाकडील ई – तिकीट मशीनची सेवा पुरविणारी कंपनी मे.ईबिक्स कॅश व सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांची मिटिंग घेवून महामंडळातील ई- तिकीट मशीन्स मधून डिजिटल पेमेंट सुविधा सुरु करणेबाबत संबंधितांना आदेशित केले होते. त्यास अनुसरून सदर प्रणालीविषयी सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून दि.१६/०९/२०२३ ते दि.३०/०९/२०२३ पर्यंत बाणेर
आगारामध्ये यशस्वी प्रायोगिक तत्वावर चाचणी घेतली आहे.
त्यानुसार रविवार, दि. १ ऑक्टोबर २०२३ रोजी कोथरूड आगारात दुपारी १२:०० वाजता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे शुभहस्ते व महामंडळाचे मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे उपस्थितीत महामंडळाच्या ई – तिकीट मशीन मध्ये तिकीट काढून कॅशलेस पेमेंट सुविधा सुरु करण्यात येणार आहे.
युपीआय पेमेंटमुळे प्रवाशांना व महामंडळास खालीलप्रमाणे फायदे होणार आहेत.
1. तिकीट घेण्यासाठी सुट्या पैशांची समस्या संपुष्ठात येणार आहे.
2. वाहकाकडील कॅश व्यवहार कमी होऊन कामाची गतिशीलता वाढणार आहे.
3. महामंडळाकडील कॅश व्यवहार कमी होऊन बँकेत पैसे तत्काळ जमा होणार आहेत.
4. लवकरच महामंडळाचे मोबाईल अॅपद्वारे बस ट्रॅकिंग, प्रवासाचे नियोजन व मोबाईल टिकिटिंग सुविधा
महामंडळाकडून सुरु करण्यात येणार आहे.
5. डिजिटल इंडिया या संकल्पनेला हातभार.
या पद्धतीने होणार कॅशलेस पेमेंट.
1. वाहकाकडे ऑनलाईन क्युआर कोडची मागणी करणे.
2. क्युआर कोड स्कॅन करून ऑनलाईन पेमेंट करणे.
3. वाहकाकडून निर्माण होणारे आपले तिकीट प्राप्त करणे.
