Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

‘विश्वगुरु’ रथातून निघणार शारदा गजाननाची विसर्जन मिरवणूक

पुणे : अखिल मंडई मंडळाची विसर्जन मिरवणूक भव्य ‘विश्वगुरु’ रथातून निघणार आहे. मंडळाचे गणेशोत्सवाचे यंदा १३० वे वर्ष आहे. गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला गुरुवार, दिनांक २८ सप्टेंबर रोजी थाटात निघणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली.
मंडळाच्या वतीने विश्वगुरु रथ साकारण्यात आला आहे. स्वामी समर्थांची १० फूट उंचीची मूर्ती रथावर असून श्री दत्त महाराजांचे थ्री डी पेंटींग रथावर साकारण्यात आले आहे. स्वामींच्या मूर्ती मागे श्री यंत्र असणार आहे. कर्दळी वनात वाळूतून प्रगट झालेले स्वामी अशी सजावटीची  संकल्पना आहे. विशाल ताजनेकर यांनी रथाचे कलादिग्दर्शन केले आहे.
ऊंची ३० फूट आणि रुंदी १५ फूट असलेल्या या विसर्जन रथाची लांबी २१ फूट असणार आहे.
या रथावर विविध लाईट्स लावण्यात येणार आहेत. रथामध्ये हायड्रोलिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून ३० फूटची ऊंची अडथळा येईल तिथे १५ फूट होणार आहे.  मिरवणूकीच्या अग्रभागी जयंत नगरकर बंधू यांचे नगारा वादन असणार आहे. त्यामागे गंधर्व बँड असणार आहे. तसेच शिवगर्जना वाद्य पथकासह आणि नादब्रह्म ढोल ताशा पथक ट्रस्ट  मिरवणुकीत सहभागी होतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading