किर्लोस्कर ऑईल इंजिन्सकडून सीपीसीबी IV+ प्रमाणित जेनसेट्स, फ्लेक्झी-फ्यूएल व ऑप्टीप्राइम रेंजची सर्वात मोठी श्रेणी लाँच
पुणे: किर्लोस्कर ऑईल इंजिन्स (केओईएल) या ऊर्जा निर्मिती उद्योगामधील अग्रणी कंपनीने सीपीसीबी IV+ प्रमाणित जेनसेट्सच्या श्रेणीच्या लाँचची घोषणा केली आहे. उच्च कार्यक्षम, इंधन-कार्यक्षम व पर्यावरणास अनुकूल सोल्यूशन्स वितरित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासह नवीन जेनसेट्स सेंट्रल पोल्यूशन कंट्रोल बोर्ड (सीपीसीबी) ने निर्धारित केलेल्या आधुनिक उत्सर्जन नियमांचे पालन करतात.
या जेनसेट्समधून किर्लोस्करची शाश्वत ऊर्जा निर्मिती व पर्यावरणीय व्यवस्थापनाप्रती कटिबद्धता दिसून येते. हे जेनसेट्स विविध क्षेत्रांमधील विविध ऊर्जा गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत, ज्यामधून व्यवसायांना व समुदायांना अधिक विश्वसनीय, शुद्ध व सर्वोत्तम ऊर्जा उपलब्ध होण्याची खात्री मिळते.
किर्लोस्कर जेनसेट्स डिझेल, नैसर्गिक वायू, बायोगॅस अशा विविध इंधन पर्यायांवर कार्यक्षमपणे कार्यरत राहण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत, ज्यामधून ग्राहकांना अद्वितीय स्थिरता मिळते.
इंधनयुक्त जेनसेट्स प्रदान करत किर्लोस्करचा व्यवसायांना व उद्योगांना त्यांच्या गरजा, लोकेशन व उपलब्धतेनुसार सर्वात अनुकूल इंधन स्रोत निवडण्यास सक्षम करण्याचा मनसुबा आहे. हा उपक्रम ब्रॅण्डची रिसोर्स ऑप्टिमायझेशनप्रती कटिबद्धता अधिक दृढ करतो, तसेच हरित व अधिक ऊर्जा-कार्यक्षम भविष्याप्रती योगदान देतो.
किर्लोस्कर आयओटी-सक्षम जेनसेट्स लाँच करणारी पहिली कंपनी होती, जेथे क्षेत्रामध्ये ६०,००० हून अधिक जेनसेट्स यशस्वीपणे तैनात करण्यात आले आहेत. डेटामधून निदर्शनास येते की, ९० टक्के जेनसेट्स सर्वाधिक कार्यसंचालन कालावधीदरम्यान कार्यक्षम लोड थ्रेशोल्डखाली कार्यरत राहतात. किर्लोस्करची पेटेण्टेड हायब्रिड तंत्रज्ञानावर आधारित ऑप्टिप्राइम जेनसेट्सची नवीन श्रेणी कार्यक्षम लोडची रेंज वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे इंधन व इतर उपभोग्य वस्तूंचा कमी वापर होत ग्राहकांची मोठी बचत होते. जेनसेट्सची ऑप्टिप्राइम श्रेणी ग्राहकांसाठी अधिक स्थिरता, कमी उत्सर्जन आणि अधिक बचतीची खात्री देते.
जेनसेट्सची ही नवीन श्रेणी आयओटी-सक्षम आहे, ज्यामुळे ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व त्यांच्या देखरेखीमध्ये आमूलाग्र बदल घडून येत आहे. प्रगत कनेक्टीव्हीटी व डेटा विश्लेषणाच्या माध्यमातून रिअल-टाइम इनसाइट्स, अंदाजात्मक देखभाल आणि कार्यरत कार्यक्षमता वाढवणाऱ्या रिमोट मॉनिटरिंग क्षमता शक्य झाल्या आहेत.
जेनसेट्समध्ये आयओटी तंत्रज्ञानाच्या समावेशामधून ग्राहक-केंद्रित सोल्यूशन्स प्रदान करण्याच्या बाबतीत उद्योगामध्ये अग्रस्थानी असण्याचा किर्लोस्करचा दृष्टिकोन दिसून येतो. या नवीन जेनसेट्ससह ग्राहक त्यांच्या ऊर्जा निर्मिती मालमत्तांवर अद्वितीय नियंत्रण, विश्वसनीयता व दृश्यमानतेचा अनुभव घेऊ शकतात.
किर्लोस्कर ऑईल इंजिन्सला आपल्या ‘मेक इन इंडिया’ ओळखीचा अत्यंत अभिमान वाटतो, जे जागतिक स्तरावर दर्जा व नाविन्यतेचे प्रतीक आहे. अनेक दशकांचा वारसा असलेल्या किर्लोस्करच्या पॉवर सोल्यूशन्सनी जगभरातील ग्राहकांचा विश्वास संपादित करण्यास मान्यता प्राप्त केली आहे.
भारतातील अभियांत्रिकी क्षमतेला सादर करणारे किर्लोस्कर जेनसेट्स विविध देशांमध्ये निर्यात करण्यात आले आहेत, जे त्यांची वाढ व विकासामध्ये योगदान देत आहे. ब्रॅण्डची सर्वोत्तमता, विश्वसनीयता व शाश्वतेप्रती कटिबद्धता जागतिक ग्राहकांशी संलग्न आहे, ज्यामुळे किर्लोस्कर कंपनी भारतातील अभियांत्रिकी व उत्पादक क्षमतांची खरी अॅम्बेसेडर आहे.
लाँच इव्हेण्टमधील आपल्या भाषणादरम्यान व्यवस्थापकीय संचालक गौरी किर्लोस्कर म्हणाल्या, ”किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेड स्थापनेपासून ऊर्जा निर्मिती उद्योगामधील लीडर आहे. डिझेल जनरेटिंग सेट्समधील बाजारपेठ अग्रणी म्हणून आमच्या उपस्थितीमधून आमचा यशस्वी प्रवास दिसून येतो. परिवर्तनाशी सुलभपणे जुळून जाण्याच्या आणि नाविन्यपूर्ण सोल्यूशन्स वितरित करण्याच्या आमच्या क्षमतेने आम्हाला भारतातील विश्वसनीय व इंधन-कार्यक्षम जेनसेट्सची अग्रणी उत्पादक कंपनी बनवले आहे. आमचा विश्वास आहे की, आमची नवीन ऑफरिंग ऑप्टिप्राइम व्हर्जन बाजारपेठेतील आमचे नेतृत्वस्थान अधिक दृढ करेल. आमच्या कार्यसंचालनांच्या मुलभूत बाबींमधून ग्राहकांप्रती आमची अविरत कटिबद्धता दिसून येते. अहोरात्र कार्यरत असलेल्या ३,००० हून अधिक समर्पित टेक्निशियन्सच्या अद्वितीय उत्पादन सेवा नेटवर्कच्या पाठबळासह आम्ही उच्च दर्जाच्या ग्राहक-केंद्रित सेवांची खात्री देतो.”
या नवीन सीपीसीबी IV+ जेनसेट्सच्या लाँचमधून किर्लोस्करची ऊर्जा निर्मिती तंत्रज्ञानामध्ये नाविन्यतेला चालना देण्याप्रती, तसेच मर्यादांना दूर करण्याप्रती कटिबद्धता सार्थ ठरते.
