भाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी घेतले ‘दगडूशेठ’ गणपतीचे दर्शन
पुणे : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी मंगळवारी सायंकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३१ व्या वर्षी गणेशोत्सवात जे.पी.नड्डा यांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
