Monday, November 2, 2026
Latest NewsPUNE

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले ‘दगडूशेठ’ गणपतीचे दर्शन

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३१ व्या वर्षी गणेशोत्सवात अजित पवार यांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply