Thursday, September 3, 2026
Latest NewsPUNE

गणेशोत्सवात जय गणेश आरोग्य सेवा अभियानांतर्गत ४७६२ रुग्णांना सहाय्य

पुणे : गर्दीमुळे श्वास घेताना झालेले त्रास… चक्कर आल्याने अवस्थ झाले रुग्ण आणि शारीरिक आजारावर उपाययोजना करिता गणेशोत्सवात जय गणेश आरोग्य सेवा अभियानांतर्गत ४७६२ रुग्णांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने सहाय्य केले. नामांकित ९ पेक्षा अधिक रुग्णालयांचे वैद्यकीय तज्ज्ञ आणि कार्डियाक रुग्णवाहिका देखील उत्सवात सज्ज आहेत.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३१ व्या वर्षी गणेशोत्सवात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. त्यामुळे केवळ महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून येणा-या भक्तांची संख्या वाढत आहे. बेलबाग चौक, बुधवार पेठ व मंदिर परिसरात गर्दीचा महापूर असल्याने अनेक आरोग्यविषयक समस्याच देखील उद्भवत आहेत. त्या समस्यांना तोंड देण्याकरिता ट्रस्टतर्फे वैद्यकीय सहाय्य दिले जात आहे.

सजावटीच्या परिसरात जय गणेश प्रांगणासह मंदिर परिसरात ३ ठिकाणी सुसज्ज अशी २४ तास मोफत वैद्यकीय मदत केंद्र कार्यरत आहेत. मंदिरासमोर संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर यांचे पहिले केंद्र आहे. तर, बेलबाग चौकाजवळ सूर्या सह्याद्री हॉस्पिटल, डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल पिंपरी, जहांगिर हॉस्पिटल, ससून सर्वोपचार रुग्णालय यांचे दुसरे केंद्र आहे. याशिवाय मुख्य उत्सव मंडपाच्या मागील बाजूस तिसरे केंद्र उभारण्यात आले असून ससून सर्वोपचार केंद्र, भारती हॉस्पिटल रिसर्च सेंटर, सिल्व्हर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मणिपाल हॉस्पिटल बाणेर हे तेथे कार्यरत आहेत. आजपर्यंत तब्बल ४७६२ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.

ट्रस्टच्या ११ रुग्णवाहिका उत्सवकाळात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड परिसरात विनामूल्य स्वरुपात कार्यरत आहेत. तसेच, सिटी पोस्ट परिसरात एनएम वाडिया ह्रदय रुग्णालय पुणे स्टेशन, गणपती मंदिर परिसरात जहांगिर हॉस्पिटल यांची कार्डियाक रुग्णवाहिका सज्ज आहे. वैद्यकीय मदत केंद्रावर तसेच रुग्णवाहिकांच्या येथे मोफत औषधे देण्यात येत असून आरोग्यविषयक सर्वतोपरी मदत भाविकांना देण्याची सुविधा ट्रस्टने उपलब्ध करुन दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading